*ग्रामिण भागातील ' घरकुलाचा ' निधी वाढवून मिळावा .* - संजय कडोळे .
. . . . . .. कारंजा.वाशीम दि.०५(प्रतिनिधी अंकुश मुंदे) : शासनाकडून राबविण्यात येणारी प्रधानमंत्री आवास योजना तसेच रमाई घरकुल योजना इ चा निधी शहरी भागात जास्त तर ग्रामिण भागात कमी देऊन, एकप्रकारे जनतेची जणू दिशाभूलच करीत आहे . याबाबतीत आम्हाला भेटलेल्या ग्रामिण भागातील नागरिकांकडून असे कळते की, ग्रामिण भागात राहणाऱ्या अस्थिव्यंग, दिव्यांग, विधवा, दारिद्रय रेषेखालील लोकांना घरकुल मंजूर झाल्यास केवळ शासनाकडून तिन -चार टप्प्यात एकूण एक लाख विस हजार रुपये दिले जातात . त्यातही आधी टप्प्या टप्प्याने जोथा, बांधकाम, स्लॅप, शौचालय बांधून दाखवा . व बांधकामा नंतर हळूहळू टप्प्या टप्प्याने पैसे दिले जातात . ग्रामस्थांचे म्हणणे असे आहे की, सध्या सिमेंट, विटा, रेती गिट्टी,लोहा याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत . शिवाय आम्हाला शहरातून या बांधकामाच्या वस्तू खेड्यात हमाली देऊन न्याव्या लागतात . त्यामुळे एवढ्या पैशात घर बांधकाम होऊच शकत नाही . तरी शासनाने याची गांभिर्याने दखल घेऊन, शहराएवढीच रक्कम म्हणजे कमीतकमी अडिच ते तिन लाख रुपये तरी ग्रामीण घरकुला करीता निधी वाढवून देण्याची मागणी, महाराष्ट्र दिव्यांग संस्था कारंजाचे संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांनी केली आहे .