*चोपडयात मोकाट कुत्र्याचा प्रचंड हैदोस..बकऱ्या व लहान बालकांचे लचके तोडल्याने सर्वत्र खळबळ..वेळीच उपाययोजना न केल्यास कोणाच्या जीवावर बेतण्याची शक्यता..?*
चोपडा दि.२७(प्रतिनिधी) चोपडा शहरात मोकाट कुत्र्यांनी प्रचंड हैदोस घातला असून अनेकांचे जीवांवर बितली आहे.ईतकेच नव्हे बेजुबान प्राण्यांचे लचकेच तोडल्याच्या घटना घडत असल्याने शहरात नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.कालच एका कॉलनीत बकरीच्या पिलासह लहान बालकावर कुत्र्यांनी हल्ला चढवून जबर जखमी केल्याची घटना घडली
चोपडा शहरात मोकाट कुत्रे भरपूर झाले आहेत . तर या कुत्र्यानी आज पावरा समाजाचा लहान मुलगा कॉलनी भागात बकऱ्या चारत असतांना सात आठ कुत्र्यांनी बकरीच्या पिलाला पडकून मारण्या चा प्रयत्न केला . व मुले कुत्र्याना मारणेसाठी पीलाची सोडणूक करणे साठी गेले असता काही कुत्र्यांनी लहान मुलाला धरले . यावेळी आजूबाजूच्या लोकांना कुत्र्यांना हुकवले असता थोडक्यात बचावला अन्यथा जास्त चावा घेतला असता तर अनर्थ घडला असता.शहरात कुत्र्यांचे घोळके मोठ्या प्रमाणावर तयार झाले आहेत नगरपालिकेतने ताबडतोब लक्ष घालून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा नागरिकांना मोठा धोका होवू शकतो तरी याचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी होत आहे