चोपडा येथे महिला काँग्रेस सेवादल मेळावा संपन्न





 चोपडा येथे महिला काँग्रेस सेवादल मेळावा संपन्न 

चोपडा दि.१८( प्रतिनिधी)15 जानेवारी 2022 रोजी चोपडा शहर महिला काँग्रेस सेवादल चा महिला मेळावा चोपडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.सरला कालिदास चौधरी होत्या. कार्यक्रमाचे आयोजन चोपडा शहर महिला काँग्रेस सेवादलाचे अध्यक्षा सौ योगिता शशिकांत चौधरी यांनी केले होते. या मेळाव्यात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.  योगिता चौधरी यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्यास चोपडा शहर काँग्रेस अध्यक्ष श्री के डी चौधरी सर यांनी मार्गदर्शन केले. एडवोकेट संदीप सुरेश पाटील, डॉ. स्मिताताई पाटील, डॉ. ऐश्वर्या राठोड, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब पवार, चोपडा शहर काँग्रेस अध्यक्ष के डी चौधरी, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महिला कॉंग्रेस सेवा दलाचे कार्य जोमाने करण्यात येईल असे प्रतिपादन सौ योगिता शशिकांत चौधरी यांनी व्यक्त केले .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने