कोकण सुपुत्र रमेश कोकमकर आयोजित के.पी.एल.क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
कोकण दि.,२७(शांताराम गुडेकर )चिपळूण तालुक्यातील कळंबट या गावचं कुणबी भूमिपुत्र रमेश हिरू कोकमकर आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा - २०२१ -०२२ खांडोत्री गावच्या फौजदार क्रिडानगरी येथे शनिवार दि.२२ जानेवारी २०२२ व रविवार दि.२३ जानेवारी २०२२ रोजी संपन्न झाली.के.पी.एल अर्थातच कळंबट प्रीमियर लीग ही दुसऱ्या पर्वातील पार पडणारी स्पर्धा होती.एक प्रयत्न होतकरू खेळाडू घडविण्याचा या विचार प्रणालीने राबविण्यात येणारी ही स्पर्धा कोव्हिड-१९ चे शासकीय नियमांचे पालन करून पार पडली.स्पर्धेचे उद्घाटन खांडोत्री गावची जेष्ठ-श्रेष्ठ मंडळी व मान्यवर यांच्या उपस्थितीत झाले.दरम्यान क्रिकेटप्रेमी स्व.अमित रांबाडे व स्व.काशीराम केंबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या स्पर्धेत सहभागी असणारे संघ स्ट्रायकर ईलेव्हन ( संघमालक - दिनेश घाणेकर ),रॉयल ईलेव्हन ( संघमालक - दीपक निर्मळ ),चॅलेंजर ईलेव्हन ( संघमालक - अनिकेत आरेकर/मनोहर पाष्टे ),दबंग ईलेव्हन ( संघमालक - महेश वीर ),सुपर लायन्स ईलेव्हन ( संघमालक - स्वप्निल नार्वेकर / TWJ कंपनी ),टायगर ईलेव्हन ( संघमालक - संतोष घाणेकर ),किंग ईलेव्हन ( गणपत भुवड/प्रदिप कातकर ),फायटर ईलेव्हन ( संघमालक - तुषार भडवळकर ) अशा स्वरुपात आठ संघमालक यांचे आठ संघ समाविष्ट होते.
के.पी.एल.स्पर्धेत अगदी रायगड/रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता.टेनिस क्रिकेट मधील उगवते सितारे यांचे क्रिकेट खेळातील क्रिडा गुण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. प्रथमेश निमुनकर यांच्या नवलाई युट्युब चॅनेलच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारण असणारी ही स्पर्धा होती.या स्पर्धेत अंतिम विजेता संतोष घाणेकर यांचा टायगर ईलेव्हन क्रिकेट संघ,उपविजेता महेश वीर यांचा दबंग ईलेव्हन क्रिकेट संघ,तृतीय क्रमांक - स्वप्निल नार्वेकर/TWJ कंपनीचा सुपर लायन्स क्रिकेट संघ तर चतुर्थ क्रमांक प्रदिप कातकर/गणपत भुवड यांच्या किंग ईलेव्हन संघ या संघांनी के. पी.एल स्पर्धेत विजयी पताका रोवली.स्पर्धेचा मालिकावीर खेळाडू राजकिरण बोले ( टायगर ईलव्हेन ),आदर्श खेळाडू - अक्षय कदम ( किंग ईलेव्हन ),उत्कृष्ट यष्टिरक्षक - बंटी चव्हाण ( दबंग इलेव्हन ),उत्कृष्ट क्षेत्ररक्षक - सागर उकार्डे ( स्ट्रायकर ईलेव्हन ),उत्कृष्ट फलंदाज - ओरेंज कॅप विजेता खेळाडू - ( राजकिरण - टायगर ईलेव्हन )उत्कृष्ट गोलंदाज - पर्पल कॅप विजेता खेळाडू - ( रोहित रोहिलकर ( सुपर लायन्स ),आदर्श संघ - किंग ईलेव्हन आदी या स्पर्धेतील चमकदार कामगिरी करणारे संघ व खेळाडू ठरले.सर्व खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख रक्कम ₹२५००० /- व आकर्षक चषक,उपविजेता संघाला रोख रक्कम ₹१५०००/- व आकर्षक चषक,तृतीय क्रमांक रोख रक्कम ₹५००० /- व आकर्षक चषक,चतुर्थ क्रमांक - आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.शिवाय स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडू यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.या स्पर्धेला शरदजी शिगवण ( माजी उपसभापती - पंचायत समिती चिपळूण ),सुरेशजी खापले ( माजी सभापती - पंचायत समिती चिपळूण )पूर्वीताई निमुणकर ( सभापती - गुहागर ता.पंचायत समिती ),सखाराम सुवरे ( सरपंच - ग्रामपंचायत खांडोत्री ),सुरेश पवार ( पोलिस पाटील - खांडोत्री गाव ),चंद्रकांत कोकमकर - ( अध्यक्ष - कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई - शाखा चिपळूण ),पत्रकार - संतोष ( भाई ) कुळ्ये,पत्रकार - सचिन घाणेकर,पत्रकार - सुदर्शन जाधव,आत्माराम पवार ( तंटामुक्ती अध्यक्ष - खांडोत्री गाव ),शाहिर तुषार पंदेरे,शाहिर भिकाजी भुवड,शाहीर सचिन धुमक,बबन नेवरेकर ( उपसरपंच - ग्रुप ग्रामपंचायत मुर्तवडे,वारेली कातळवाडी ),संजय ( बावा ) भागडे ( सचिव - चिपळूण ता.नमन भारुड संघटना ),नवोदित कवी - भास्कर आंग्रे,कवी -नितेश गोमाणे,राजू दळवी ( शिवसेना - विभागप्रमुख ),कृष्णा कोकमकर ( गुरुजी ),तानाजी कोकमकर ( गुरुजी ),सुभाष गमरे ( कळंबट पोलीस पाटील ),प्रविण खांडेकर ( उपसरपंच - वडेरू ग्रामपंचायत ),संतोष बळकटे (सरपंच - केरे,कळंबट,घवाळगाव ),शशिकांत घेवडे ( सदस्य - वीर ग्रामपंचायत ),सरिता पवार ( माजी सरपंच - खांडोत्री ग्रामपंचायत ),डॉ.पराग पावरी,महेश बारगोडे ( माजी सरपंच - ग्रामपंचायत ढाकमोली ),युवा उद्योजक/युवा शाहीर सुयश चव्हाण,क्रिकेटप्रेमी दत्ताराम रांबाडे ( गाव-केरे ),संजय आगीवले ( अध्यक्ष - एस.एस.स्मृती विकास मंडळ - कोतळूक-पिंपळवाडी ),संतोष घाणेकर ( अध्यक्ष - श्री पाणबुडी देवी कलामंच ),भालचंद्र गांगण ( व्यावसायिक - खांडोत्री ),शंकर जडयार ( सदस्य - ग्रामपंचायत खांडोत्री ),गणेश गांगण ( सदस्य - ग्रामपंचायत खांडोत्री),संतोष पवार ( उपसरपंच - ग्रामपंचायत खांडोत्री ),जयराम सुवरे,विजय कोकमकर,संजय कोकमकर,दिपक चव्हाण, निलेश लांबे,सुधीर खांबे,दीपक कावणकर ( ऍडमीन - गुहागर माझी शान - फेसबुक ग्रुप ),प्रशांत पाडावे ( प्रस्तुतकर्ता-कोकणी साज युट्युब चॅनेल ),आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली.या स्पर्धेला आकर्षण ठरलं होतं ते कवी/शाहीर सचिन धुमक ( ढाकमोली ) यांनी रचलेली व पंचक्रोशीतील युवा गायकांनी गायलेली या स्पर्धेची गुणगाण गाणारी गाणी मैदानात वाजताना अनेकांची मन जिंकून जाणारी होती.स्पर्धेसाठी पंच म्हणून कामगिरी अमित खांडेकर सह राजू कणगुटकर यांनी पाहिली.स्पर्धेचे समालोचन सिद्धीक मेहमान,विक्रांत टेरवकर व अमित आदवडे यांनी केले.स्पर्धेला लाभलेल्या अनेक देणगीदार,हितचिंतक यांच्या सहकार्याने पंचक्रोशीतील एक आगळीवेगळी स्पर्धा म्हणून क्रिडाप्रेमींना भावलेल्या या स्पर्धेचे व आयोजक रमेश कोकमकर यांचे विविध स्तरातून या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदनासह कौतुक होत आहे.