राहिला पार्क एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा


राहिला पार्क एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा 

मुंबई दि.२७(शांताराम गुडेकर) :राहिला पार्क एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी देवीदास पुरोहित यांनी देशभक्तीपर गीत गायले. तर सौ.मनीषा कदम यांनी लोकांच्यामध्ये प्रेम भावना जागृत झाल्या पाहिजेत यासाठी गीत गायले.हर्ष साली यांनी या कार्यक्रम बाबत उल्लेखनिय असे भाषण केले.याशिवाय राहिला पार्क चषक सिजन- २ बॉक्स क्रिकेटचे आयोजनही  करण्यात आले होते. सर्वांना यावेळी मास्क वाटप करण्यात आले. तर मुलांना पेन्सिल वाटप केले.एक आगळा वेगळा आनंदउत्सव यनिमित्ताने साजरा करण्यात आला.यामध्ये प्रामुख्याने जावेद मुंबईकर युट्युब चॅनल यांचे मोलाचे योगदान होते. सर्व देणगीदार यांच्यामुळे हे सर्व कार्यक्रम शक्य झाले त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समितीचे मुंबई जिल्हा सदस्य/पत्रकार मोहन कदम यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने या सर्व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने