महावीर नगरात एकाच दिवशी एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीन बंद घरे फोडले..चांदीचे ऐवज चोरी.. भुरट्या चोरट्यांनी रहिवासी हैराण..* *शहरात अनोळखी भिकारी व अनोळखी घरगुती वस्तू विक्री करणाऱ्यांची गर्दी फोफावतेय.. यांकडे पोलिसी नजर फिरणे गरजेचे..!*







 





महावीर नगरात एकाच दिवशी एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीन बंद घरे  फोडले..चांदीचे ऐवज चोरी.. भुरट्या चोरट्यांनी रहिवासी हैराण..* *शहरात अनोळखी भिकारी व अनोळखी  घरगुती वस्तू विक्री करणाऱ्यांची गर्दी फोफावतेय.. यांकडे पोलिसी नजर फिरणे गरजेचे..!*

चोपडादि.२८( प्रतिनिधी ) शहरातील  महावीर नगर परिसरात एक नव्हे दोन नव्हे तब्बल तीनं घरे एकाचवेळी फोडून अज्ञात चोरट्यांनी  घाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र चांदीच्या किरकोळ वस्तू घेऊन चोरटे पसार झाल्याने  प्रचंड खळबळ उडाली आहे. सकाळी सकाळीच पोलिस गाडी घोंघावत आल्याने अनेकांना गर्दी केली मात्र कालच गादी विकणारे गल्ली बोळात फिरत असल्याची परिसरात चर्चा होती.अशा अनोळखी विक्री करणारे पर जिल्ह्यातील भिकारी ही तंबू ठोकुन निवास करत असल्याने लोकांची डोकेदुखी वाढली आहे.या इसमांची ओळख परेड करण्याकडे पोलिसांनी लक्ष घालते नितांत गरजेचे असल्यानचे मत शहरवासीयांनी व्यक्त केले आहे .
याबाबत प्राप्त माहिती अशी की, काल दि.२७ जानेवारीच्या मध्य रात्रीस अज्ञात चोरट्यांनी  महावीर नगरातील आत्माराम महाजन,शिलाबाई महाजन व अरुण चव्हाण यांच्या बंद घराचे कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करुन घरातील कपाट उघडून चांदीच्या पाटल्या,चांदीची लक्ष्मीची मूर्ती,व चांदीचा ग्लास असा चार/पांच हजारांचा माल पोबारा केला. घरात काहिच नसल्याने चोरट्यांना काढता पाय घ्यावा लागला आहे.मात्र या परिसरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने रहिवास्यामध्ये  भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  चोरट्यांनी बंद घरे बघून डाव साधण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.दरम्यान शहर पोलिसांत भ्रमणध्वनीवरून मिळालेल्या माहितीनुसार पोनि श्री.चव्हाणसाहेब हे पोलिस फौजफाटा घेऊन दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा केला .अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने