चोपडा दि.०५(प्रतिनिधी)
श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने शासकीय आदिवासी मुलींची आश्रमशाळा वैजापूर ता. चोपडा जि. जळगाव येथे "राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले" यांच्या जयंती निमित्ताने व आदिवासी समुदायाच्या हक्कासाठी लढणारे "जयपाल सिह मुंडा" यांच्या जयंती निमित्ताने समाजकार्य महाविद्यालयाच्या प्रा.
डॉ.संबोधी देशपांडे यांचे मासिक पाळीचे व्यवस्थापन" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान शासकीय आश्रमशाळेतील जेष्ठ शिक्षिका बोरोले मॅडम यांनी भूषविले उदघाटन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले व प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी वंदना बाविस्कर, चंद्रकला इंगळे, श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र महाजन, खान्देश विभागीय संपर्क प्रमुख समाधान माळी सर, जिल्हाध्यक्ष महेंद्र माळी, शहर कार्याध्यक्ष नरेंद्र महाजन सर व आश्रम शाळेचे प्राचार्य व्ही बी माळी सर हे होते.
प्रा.डॉ संबोधी देशपांडे यांनी मुलींना किशोर अवस्थेत होणारे बदल व मासिक पाळीचे व्यवस्थापन" या विषयावर आरोग्याविषयी विद्यार्थिनींशी मुक्तपणे व्याख्यानातून संवाद साधला.
या निमित्ताने आश्रम शाळेतील विद्यार्थिनींनी मी सावित्रीबाई फुले बोलतेय हे एक पात्री नाटक सादर केले तसेच एका गटाने कोरोना बाबत जनजागृती साठी पथनाट्य सादर केले
या प्रसंगी प्रा.डॉ संबोधी देशपांडे यांनी सर्व शिक्षकांना पेन भेट देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेसाठी संदीप सारंग यांनी लिहिलेले "सरस्वती कि सावित्री" आणि इतर काही पुस्तके भेट देण्यात आली. तसेच
विद्यार्थिनींनी "कोरोना विषयी जनजागृती" यावर पथनाट्य सादर केले. त्यांचेही पेन देऊन अभिनंदन केले.
सदर कार्यक्रमात श्री संत सावता माळी युवक संघाच्या कार्याबाबत शहर कार्याध्यक्ष नरेंद्र महाजन यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीपणे राबविणेसाठी शाळेतील श्री पी बी बडगुजर, व्ही जे जाधव, पी बी बोदवडे, व्ही टी राठोड, आर जी दिघाडे, जे आर कंखरे, श्रीमती एस आय तडवी, श्री वाय एस चौधरी, श्री आर बी बारेला,ए सी बारेला ,श्रीमती एस आर बारेला, एस ए टेंभुर्णे व श्री जे एम तडवी अधीक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तडवी मॅडम व आभार जाधव सर यांनी मानले.