*अनाथांच्या आई माई सिंधुताई*



 




*अनाथांच्या आई माई सिंधुताई*

चोपडा दि.०५ ( प्रतिनिधी)

अनुभूती इंग्लिश स्कूल जळगाव येथे सिंधुताईंना भेटण्याची सुवर्णसंधी मला मिळाली.बेटी बचाव वरील कवितेची फोटो प्रत व कन्यादान स्मरणिका  मी माईंना भेट म्हणून दिली. स्मरणिके  वरील त्यांचा फोटो पाहून त्यांनी स्मितहास्य केले.मी अनाथांसाठी काम करते बेटा तू गर्भातील मुलींची हत्या रोखण्यासाठी काम करीत आहे हे कार्य असेच सुरू ठेव .अशा शुभेच्छा रुपी आशीर्वाद मला मिळाले समोरच्या भेटणाऱ्या व्यक्तीवर स्वतःच्या मुलांप्रमाणे त्या प्रेम करीत व मायेची ऊब देत असत.

त्यांचे शिक्षण चौथीपर्यंत झालेले होते पण रेल्वेमध्ये भीक मागत असताना अनुभवांची शिदोरी जी त्यांना मिळाली होती त्या अनुभवांमुळे त्यांचे भाषण म्हणजे जणूकाही पीएचडी धारक महिलाच आपल्यापुढे विचार मांडते आहे असे वाटे.चोपडा येथे त्यांचे भाषण ऐकण्याची संधी मला व माझ्या कुटुंबाला भाषण ऐकण्याची संधी मिळाली‌. त्यांचे भाषण पुन्हा पुन्हा ऐकावे असेच असे वाटे. त्या भाषणात शेरोशायरी चाही वापर करीत असत असतं. त्यामुळे त्यांचे भाषण भावपूर्ण व मनोरंजनात्मक होई

पुण्याला गेलो असताना त्यांना भेटण्यासाठी मी व माझा मुलगा सलमान पटेल आश्रमात पोहोचलो. त्यांनी मायेच्या प्रेमाने विचारपूस केली मी आश्रमा बद्दल माहिती त्यांच्याकडून मिळवली. त्यांचे भाषण मला माझ्या जन्मगावी लासुरला ठेवायचे होते पण ती माझी इच्छा अपूर्ण राहिली." जेवण करून जा रे माझ्या लेकरांनो" असे प्रेमाने आग्रह करणाऱ्या सिंधुताईंनी फोटो काढण्याचे सांगताच सेल्फीच काढा असे हसतच सांगितले.

एस.टी पाटील लिखित आमची माई हे सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावरील अनुभवाची शिदोरी असलेले पुस्तक मी लासूरच्या लासूर कन्या शाळेत परिपाठात दररोज वाचन साठी निवडले होते. त्यांच्या कथा ऐकून मुलींच्या डोळ्यातून पाणी येई .एका शाळेत माझ्या जीवनावरील पुस्तकाचे वाचन परिपाठात केले जात आहे हे समजल्यावर त्यांना अत्यानंद झाला. अशा या अनाथांच्या आई ला माझी भावपूर्ण श्रद्धांजली


       श्रध्दांजली वाहक

*अब्दुल सरदार पटेल चोपडा*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने