साई एकदंत र. से. संघाने केला नालासोपारा येथे कर्तव्यदक्ष सेवकांचा प्रजासत्ताक दिनी सन्मान
नालासोपारा दि.३०( शांताराम गुडेकर)नालासोपारा पूर्व नागीनदास पाडा, जय गणेश नगर येथील साई एकदंत रहिवासी सेवा संघ अंतर्गत २३ इमारती एकत्रित येऊन प्रथम नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि सुख दुःखात सहभागी होणारी ही संघटना आहे. तब्बल २३ इमारती मध्ये सातशे वीस रूम धाराक आपले सुख दुःख वाटत असतात. या संगटनेचे ब्रीदवाक्य म्हणजे "प्रसंग जिथे साई एकदंत तिथे" आणि इमारती व परिसरात प्रामुख्याने सुख सुविधा व नगरपालिकेच्या माध्यमातून राबवत आहेत.म्हणूनच ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शासकीव व अशासकीय कर्तव्यदक्ष सेवकांना सन्मानित करण्यात आले. त्यात अकरा सफाई दूत, महावितरण उपअभियंता श्री. विक्रांत कंदीकुरवार, महावितरण कर्मचारी, वसई विरार महापालिका आरोग्य अधिकारी सौ. कविता जगदा आणि नर्स व रुग्णसेवक, वसई विरार महापालिका पाणी पुरवठा अधिकारी व कर्मचारी, डॉ रामश्रीकांत कुलकर्णी, डॉ यादव, पोलीस अधीकारी आय पी एस संतोष सोलनकर सर, आय पी एस मोरे सर, कॉन्स्टेबल श्री. प्रकाश ननावरे, आरोग्य सेवक तथा समाजसेवक श्री. दिपक होरा, विभागीय रेशनदुकान सहकारी जया भावसार, स्ट्रीट लाईट कर्मचारी, कीटक नाशक कर्मचारी अशा तब्बल ३६ कर्तव्यदक्ष सेवकांचा सन्मान करण्यात आला. त्या वेळी साई एकदंत रहिवासी सेवा संघाचे सचिव श्री. दीपक मांडवकर म्हणाले की, हा सन्मान म्हणजे अखंड जग थांबले असताना अविरत सेवा प्राप्त करू परिसर स्वच्छ करण्या पासून ते सुविधा ते सुरक्षा पर्यंत सेवा दिली. म्हणूनच आज त्यांना सन्मानित करण्यात आले. तर अध्यक्ष यांनी सुरवातीला माजी.नगरसेवक स्वर्गीय किसन मामा बंडागळे, स्वर्गीय सदस्य सचिन सावंत, स्वर्गीय मार्गदर्शक नरेश सकपाळ याना श्रद्धांजली अर्पण केली. तर सर्व कर्तव्यदक्षकांचे आभार मानले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ मार्गदर्शक श्री. बाळकृष्ण येरापले, शिवसेना उप शहरप्रमुख वैभजी पालव, उप विभाग प्रमुख निलेश तेलंगे, युवा नेतृत्व ऋतुराज बंडागळे, श्री. ब्रिजेश पेंडा श्री.सुनील गावडे,धर्मेशजी सरोज, अन्य मंडळी उपस्थित होती. तर या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी २३ इमारतीच्या सदस्यांनी घेतली. पण अगदी सुरवाती पासून ते शेवट पर्यंत सदस्यांनी आपली कामगिरी चोक बजावून आपले कर्तव्य पूर्ण केले. या कार्यक्रमात सर्वात मोठे योगदान कॅरॅब्रिनी स्कुलचे मुख्याध्यापक श्री गणेश मोरे सर श्री. दीपक हरियाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. तर महिला बचतगट यांनी देखील अल्पहार बनवण्यासाठी योगदान दिले. तर समाज सेवक डॉ संजय जाधव यांनी देखील या कार्यक्रमास जागा उपलब्ध करू दिली व हा सन्मान कार्यक्रम साई एकदंत रहिवासी संघाच्या वतीने संपन्न झाला.