राष्ट्रीय महापुरुषांच्या विचारांना बगल देत ऐतिहासिक संदर्भ लावून सद्या देशात महापुरुषांची नव्याने मांडणी करणे चिंताजनक : प्रा.संदीप भास्कर पाटील
चोपडा दि.30,(प्रतिनिधी) येथे दि.३० जानेवारी २०२२ रोजी हुतात्मादिन निमित्त इतिहास विभाग,महात्मा गांधी अभ्यास व संशोधन केंद्र आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलतांना प्रा.पाटील म्हणाले की,
महात्मा गांधींना कितीही वेळा गोळ्या घातल्या तरी ते संपणार नाहीत,त्यांना वैचारिक अमरत्व प्राप्त झाले आहे.
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील जाणकार व विचारवंत अभ्यासकांनी सद्या देशात सुरू असलेल्या इतिहासाचे विकृतीकरण विरोधात वाणी लेखणीचा
प्रभावी वापर करावा असेही त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
तत्पूर्वी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल.चौधरी यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले या वेळी उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही.टी.पाटील,प्रा.एन.एस.कोल्हे
उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे,
उपप्राचार्य प्रा.बी.एस.हळपे,प्र.रजिस्टार श्री.डी.एम.पाटील,विदयार्थी कल्याण अधिकारी प्रा.डॉ.शैलेश वाघ,आदी मान्यवरांनी सुमनांजली अर्पण करत
सर्वांनी दोन मी.उभे राहून महात्माजींना अभिवादन केले.
इतिहास विभाग प्रमुख प्रा.सौ.सुनीता
पाटील यांनी प्रस्ताविकातून महात्मा गांधींच्या विचार आणि कार्या बाबत उपस्थितांना अवगत केले.
कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी कोविड नियमांचे पालन करीत उपस्थित होते.