*अ. भा. योगशिक्षक महासंघाचा पहिला राज्यस्तरीय 'महायोगोत्सव' मोठ्या उत्साहात संपन्न:- प्रा. राहुल बी. येवला*


 



*अ. भा. योगशिक्षक महासंघाचा पहिला राज्यस्तरीय 'महायोगोत्सव' मोठ्या उत्साहात संपन्न:- प्रा. राहुल बी. येवला* 

चांदवड दि.०२(तालुका प्रतिनिधी सुनील अण्णा सोनवणे):- अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे पहिले दोन दिवसीय अधिवेशन 'महायोगोत्सव'  वेरूळ (औरंगाबाद) येथे २५,२६ डिसेंबरला महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ मनोज निलपवार राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष राहुल (अंबादास) बी. येवला महासचिव कु.हर्षिता बम्बुरे, केंद्रीय समिती उपाध्यक्ष डॉ निलेश वानखेडे, मनोज नाईक, माधुरी परमार,विनायक बारापत्रे, नियोजन समिती  सचिव कृनाल महाजन,दिनेश भुतेकर,अंजली देशपांडे,अमोल बिरारे इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या कुशल नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. 


जगतगुरु संत जनार्धन स्वामींचे उत्तराधिकारी १००८ महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज यांच्या हस्ते या महायोगोत्सवाची सुरुवात झाली.


       अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ ही राष्ट्रीय पातळीवर योगाचे कार्य वाढविणारी, योगशिक्षकांचे प्रश्न सोडविणारी व त्यांना रोजगार व समाजात सन्मान मिळवुन देणारी पहिली संघटना आहे. त्यामुळे या विषयावर संमेलनात विचारविमर्ष करून पुढील दिशा ठरविण्यात आली व तसा ठराव करण्यात आला.या संमेलनात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते समरणिकेचे व महासंघा तर्फे योगावर रिसर्च करून छापलेले 'योगानुभुती' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.


        दोन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे योग शिक्षण संचालक डॉ

 जयदीप निकम यांचे 'योगशिक्षण व संशोधन क्षेत्रातिल संधी' या विषयावर व्याख्यान, चांदवड येथील राष्ट्रीय सचिव राहुल येवला यांचे 'श्वसन व संसर्गजन्य विकारांवर जलनेती व ओंकार साधनेचा परिणाम', डॉ निलेश वानखेडे नागपूर यांचे 'आयुर्वेदिक वनस्पती' मार्गदर्शन, मनोज नाईक पुसद यांचे मानवजीवनातील योगाचे महत्त्व, कृनाल महाजन जळगांव यांचे सप्तचक्र एक आत्मिक अनुभुती, डॉ राजेश भोंडे अकोला यांचे पंचवृत्ती व पंचकलेश ,आश्रम प्रमुख रामानंदजी महाराज 'आजका युवक कलके भारत का भविष्य',  इत्यादी अनेक विषयांवर अनेक योगतज्ञ  विद्वानांनी भाषणे दिली व मार्गदर्शन केले. 


तसेच महाराष्ट्रातून आलेल्या विविध भागातील योगशिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम, प्रात्यक्षिक व योगनृत्य, योगगीते,भारुड इत्यादी कार्यक्रम सादर केले.


       त्याचप्रमाणे या  कार्यक्रमात नाशिक येथील प्रा. राहुल येवला व डॉ. तस्मिना शेख यांनी आय.एन.ओ. रोगमुक्त भारत अभियान अंतर्गत प्राकृतिक चिकित्सा दिवस निमित्त महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष १००८ शिवानंदन महाराज यांच्या सहकार्याने शितकर्म, व्युत्कर्म क्रिया क्रियांचे प्रात्यक्षिक दिले व आय.एन.ओ. मार्फत सर्वांना मोफत जलनेती पात्रांचे वितरण करण्यात आले.


         निरोप समारंभ डॉ मनोज निलपवार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. तसेच रामानंद महाराज यांनी मार्गदर्शन करून योगी हा निस्वार्थी असल्याने तोच देशाचे नेतृत्व करु शकतो व देश प्रगतीपथावर नेऊ शकतो असे प्रतिपादन केले.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हे संमेलन संपन्न झाले.


       सदर कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड, आरोग्य मंत्री  डॉ. राजेश टोपे, अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष योगगुरू मंगेश त्रिवेदी,  शांतिगिरीजी महाराज, आश्रम प्रमुख रामानंद महाराज आदी मान्यवरांनी प्राकृतिक चिकित्सा व जलनेती अभियानाचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने