*सेंद्रिय शेती करण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण घेणे गरजेचे..सेंद्रिय शेती अभ्यासक रवींद्र गायकवाड*





 *सेंद्रिय शेती करण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण घेणे गरजेचे..सेंद्रिय शेती अभ्यासक रवींद्र गायकवाड*


कारंजा(वाशिम प्रतिनिधी अंकुश मुंदे)श्री रवींद्र  गायकवाड यांच्या शेतातील सेंद्रिय प्रयोगशाळा व गांडूळ खत प्रकल्प या ठिकाणी सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली यावेळी रवींद्र गायकवाड बोलत होते शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्यापूर्वी सेंद्रिय शेतीचे तांत्रिक धडे घेणे गरजेचे असल्याबाबत रवींद्र गायकवाड यांनी सांगितले तसेच सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्याने देशी गो पालन करणे खूप महत्त्वाचे आहे गोपालन शिवाय सेंद्रिय शेती करणेशक्य नसल्या  बाबत रवींद्र गायकवाड यांनी सांगितले शेतामधील शेंद्रीय कर्ब वाढविण्याकरता करता गांडूळ खत व बायोडायनॅमिक कंपोस्ट तसेच जीवामृत दशपरणी अर्क तरल खात गोबर गॅस ची स्लरी वापर करण्याबाबत रवींद्र गायकवाड यांनी सुचवले 

या कार्यक्रमाला कारंजा मानोरा वाशिम येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते रवींद्र गायकवाड यांच्या शेतामधील सेंद्रिय प्रयोगशाळे मध्ये एवढ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना रोज एक ते दोन तासाची प्रशिक्षण दिले जाते सदर प्रशिक्षणाचा लाभ शेतकरी मित्रांनी घ्यावा असे आवाहन रवींद्र गायकवाड यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरता बाळू इंगळे, किरण  निचळे, राहुल इंगळे, अजय निचळे पद्माबाई, सोनू बाई, मनोज इंगळे, आनंद फुके, पवन राठोड, तुरक सर सुरेश गायकवाड, जयाजी गायकवाड, भाग्यश्री गायकवाड, नरेश गोरे आदि लोकांनी परिश्रम घेतले


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने