साकळी शारदा विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी वंसतराव महाजन यांचा निवड झाल्याबद्दल सत्कार


 




साकळी शारदा विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी वंसतराव महाजन यांचा निवड झाल्याबद्दल सत्कार 

 

 मनवेल  ता.यावल दि.०२(गोकुळ कोळी):-शिक्षणप्रेमी तथा माजी जि.प.सदस्य वसंतराव रामजी महाजन यांनी दि.२४ डिसे.२०२१ रोजी शारदा विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदाची सलग ३५ वर्ष पूर्ण केल्याबद्दल तसेच दि.३१ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वसंतराव महाजन यांचा कुशल नेतृत्व व कर्तुत्वाचा 

सत्कार दि.३१ रोजी त्यांच्या निवासस्थानी ग्रामविकास पॅनलचे ग्रा.पं.सदस्य तसेच श्यामभाऊ महाजन मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आयोजित केला होता.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष वसंतराव महाजन व त्यांच्या पत्नी माजी जि.प.सदस्या सौ. विद्याताई महाजन यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन चौधरी, ग्रा.पं.सदस्य जगदीश मराठे, सै.अशपाक सै.शौकत,सौ.मंगला बडगुजर, सौ.निलिमा नेवे,रबाना तडवी यांचेसह प्रगतिशिल शेतकरी जितेंद्र महाजन, जिवन बडगुजर,सलिम तडवी यांचेसह श्याम भाऊ महाजन मित्र परिवाराचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने