फैजपुर येथे कोळी समाजाच्या वधु वर परीचय मेळावा उत्साहात सपन्न
मनवेल ता.यावल दि.०२(प्रतिनिधी) : कोळी समाजाच्या वधु वर परीचय मेळावा फैजपुर येथील सुमंगल लाँन मधे उत्साहात सपन्न झाला.
रावेर - यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीषदादा चौधरी जि,प,गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे आयोजक नारायणभाऊ कोळी साकरीकर व विविध समाज बांधवाच्या उपस्थित आद्य कवि महर्षि वाल्मीक ऋषी यांचा प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी आ.शिरीषदादा चौधरी यांनी उपस्थित वधु वरांना कमी खर्चात व कमी वेळेत वधु वर मेळाव्यात इच्छुक वधु वर यांना मेळाव्यात होणाऱ्या कमी खर्च बाबत काटकसार बद्दल मार्गदर्शन केले.
या कार्याक्रमात दिडशेच्या उपवर वर वधु वरांनी परीचय करुन दिला व लवकरच सामुहीक विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार असुन लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी रावेर यावल जामनेर मुक्ताईनगर जळगाव चोपडा तालुक्यातील विविध समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी जि,प,सदस्य आत्मराम कोळी, रावेर प,स.सभापती कविता कोळी, सुनिता तायडे, वढोदा सरपंच संदिपभैय्या सोनवणे , मनोहर कोळी, बंडुभाऊ कोळी, नंदुभाऊ सोनवणे, पाडळसा सरपंच खेमचंद कोळी ,भुसावळ प.स.सभापती वंदना उन्हाळे डाँ स्वप्नील साळुंखे,अशोक सपकाळे ,आशा टोकरे सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.