यावल पंचायत समिती कडून दिव्यांग सेनेच्या मागण्या मंजूर*
यावल दि.२५(प्रतिनिधी)
दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांच्या आदेशानुसार व दिव्यांग सेना जिल्हा सल्लगार राहुल कोल्हे यांच्या मार्गदर्शना नुसार दिव्यांग सेना यावल तालुका अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी के.सी सपकाळे साहेब पंचायत समिती यावल यांना निवेदन दिले होते.यावल तालुका ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दिव्यांग बांधवांना दिव्यांग कल्याणकारी 5 % निधीचे वाटप करण्यात यावे, विना अट घरकुल योजना, घरपट्टी मध्ये 50 टक्के सूट,ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग बांधवांचा सर्वे करावा.तसेच सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळावा.आदी मागण्या नमूद करण्यात आल्या होत्या.त्यानुसार गटविकास अधिकारी IAS नेहा भोसले यांनी तात्काळ मागण्या मंजूर करून दिव्यांग सेना तालुका अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी यांना मागण्या मंजुरी चे पत्र दिले. त्यावेळेस नितीन डोहळे जिल्हा सल्लागार राहुल कोल्हे, तालुका उपाअध्यक्ष अशोक कोळी,तालुका सचिव चेतन तळेले,विशाल दांडगे उपस्थितीत होते.