*महापौर व उपमहापौर यांनी दिलेला पाळला शब्द .. प्रभाग 17 येथील संत ज्ञानेश्वर नगरचे डीपी रोडचे काम पूर्ण*

 *महापौर व उपमहापौर यांनी दिलेला पाळला शब्द .. प्रभाग 17 येथील संत ज्ञानेश्वर नगरचे डीपी रोडचे काम पूर्ण*









लातूर दि.२५(प्रतिनिधी सौरभ खरोसेकर):

मागील जवळपास 30 ते 35 वर्षांपासून प्रभाग 17 येथील संत ज्ञानेश्वर नगर ला पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांनी विविध ठिकाणी अर्ज दिलेले होते त्यात रणांगण युवा प्रतिष्ठाण तर्फे मनपा उपमहापौर श्री चंद्रकांत बिराजदार यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी लागलीच त्यावर निर्णय घेऊन तो रस्ता मंजूर केला व नागरिकांसाठी खुला केला.त्याबद्दल रणांगण युवा प्रतिष्ठाण तर्फे मनपा महापौर श्री विक्रांत गोजमगुंडे, मनपा उपमहापौर श्री चंद्रकांत बिराजदार,मनपा नगरसेवक श्री अनंत गायकवाड, मनपा नगरसेविका सौ शोभाताई पाटील यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.यावेळी रणांगण युवा प्रतिष्ठाणचे सं. अध्यक्ष श्री सौरभ खरोसेकर, कार्यकारी अध्यक्ष श्री संजयकुमार कावळे,महिला अध्यक्षा सौ रूपाताई अवधूते,श्री सोमनाथ तांबोळे,अनिकेत बाचके,अजय हिप्परगे,महेश भोसले,रणजित पारशी, प्रेम हराळे, ओंकार भारती, श्री माने,वसंत भेंडे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुधीर जोशी यांनी केले व आभार वसंतराव भेंडे यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने