श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे जी पॅट सेल अंतर्गत निवडक विद्यार्थ्यांसाठी 24 जानेवारी पासून टेस्ट सिरीज
चोपडा दि.22 (प्रतिनिधी): महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे जी पॅट सेल अंतर्गत जी पॅट २०२२ या पदव्युत्तर एम फार्म प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेसाठी अनुभवी मार्गदर्शक प्रा. डॉ. अविनाश ढाके, प्राचार्य, एस. एम. बी. टी. कॉलेज ऑफ फार्मसी धामणगाव, जिल्हा नाशिक यांचे ऑनलाइन लेक्चर सिरीज दिनांक १९,२० आणि २१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली होती व त्याचाच एक भाग सोमवार दिनांक 24 जानेवारी पासून टेस्ट सिरीज निवडक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार आहे. श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा येथे पदव्युत्तर एम फार्म फार्मास्युटिक्स आणि एम फार्म फार्माकोग्नोसी विषयातील अभ्यासक्रम पायाभूत संशोधन सुविधांसह तसेच तज्ञ मार्गदर्शनासह उपलब्ध आहेत. महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील व उपाध्यक्ष सौ. आशाताई पाटिल आणि सचिव डॉ.सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या प्रोत्साहन पूर्वक मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य प्रा डॉ गौतम वडनेरे यांच्या मार्गदर्शनानुसार जी पेट सेल 2022 ने 1 ऑक्टोंबर ते 11 नोव्हेंबर 2021 कालावधीत प्रा. अतुल साबे यांनी फिजिकल फार्मास्युटिक्स,प्रा. रोहित पाटील यांनी मायक्रोबायोलॉजी तसेच प्रा. जे टी निंबाळकर यांनी मेडिसिनल केमिस्ट्री या विषयांवर बहुपर्यायी प्रश्न संच यांची सराव परीक्षा घेतली महाविद्यालयाने नोव्हेंबर 2021 मध्ये डॉ गौरव हरला का. डॉ मोहम्मद सिद्दीकी. व डॉ वंदना पाटील आणि डॉ प्रदीप बोलाने या नामांकित कॉलेजच्या तज्ञ प्राध्यापकांचे जी पॅट 2022 वर गेस्ट लेक्चर घेतलेले आहेत. सदर कार्यक्रमासाठी जी पॅट सेल प्रमुख प्राध्यापक डॉ. ए.व्ही. पाटील तसेच सेल मेंबर ने मेहनत घेतली. जी पॅट सेल 2022 ने वेळोवेळीआयोजित या ऑनलाइन लेक्चर सिरीजचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.