अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन रखडले..कर्मचाऱ्यांत असंतोष आयटक चा आंदोलनाचा इशारा
चोपडा दि.२२(प्रतिनिधी).. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना गेल्या महिन्याचे मानधन न मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार की, मानधना संदर्भात जबाबदार अधिकारी आठ दिवस रजेवर असल्याने मानधन बिले त्यांनी तयार केली गेली नाहीत. गेल्या सोमवारी ते ड्युटीवर हजर झाले त्यांनी सांगितल्यानुसार की, येत्या दोन दिवसात म्हणजे बुधवारी वा गुरुवारपर्यंत त्यांना मानधन मिळेल अशी अपेक्षा होती आणि त्यानुसार अंगणवाडी सेविका मदतनीस मानधनाची वाट पाहत होते प्रत्यक्षात आठवडाभर ओलांडला तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन नाही. ज्यांचे जीवन अंगणवाडी सेविका मदतनीस पदाचे मानधना वरच अवलंबून आहे. अशांची फार आर्थिक ओढाताण होत आहे. तरी या कर्मचाऱ्यांना त्वरित मानधन मिळावे अन्यथा या प्रश्णी आंदोलन केले जाईल असा इशारा जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अमृतराव महाजन यांनी दिला आहे..या महिला कर्मचारी चे दुर्दैव असेकी त्यांना ना टी ए बिले ना गणवेश शासनाने दिला..को विड ची कामे करतात मोबदला मिळत नाही या कर्मचारी चे प्रश्र्नी जिल्हा व राज्य तील जबाबदार अधिकारी यांनी लक्ष द्यावे असेही आवाहन संघटनेने केले आहे