*वर्डी ग्रामपंचायत काही सदस्यांनी वेळेत मालमत्ता कर न भरल्याने अपात्रतेची टांगती तलवार*

 




*वर्डी ग्रामपंचायत काही सदस्यांनी वेळेत मालमत्ता कर न भरल्याने अपात्रतेची टांगती तलवार*

*वर्डी,ता.चोपडा दि.२७ (वार्ताहर डॉ रवि शिरसाठ ) चोपडा* येथील ग्रामपंचायत कार्यालयाला लागलेले ग्रहण सुटायचे नावच घेत नसून ,14 व्या वित्त आयोगातील झालेल्या विकास कामात भ्रष्टाचाराची चौकशीला अधिकारी व पदाधिकारी सामोरे जात असताना ,आता ग्रामपंचायत सदस्यांनी मालमत्ता कर भरणा मुदतीत न भरल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मालमत्ता कर नोटीस पावती मिळाल्यापासून मुदतीत कर भरणा न केल्याने, सदस्या शोभाबाई अशोक ठाकरे व कस्तुराबाई सुरेश भिल यांच्या विरोधात, रवींद्र धनगर यांनी 20 ऑक्टोंबर रोजी गट विकास अधिकारी चोपडा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे ,त्यासाठी दोघा ग्रामपंचायत सदस्या व कार्यवाही व अपात्र तेची मागणी तक्रारदार यांनी केली आहे. त्यानुसार चौकशी अधिकारी एस,टी ,मोरे यांना लागणारे दप्तर ग्राम विकास अधिकारी व लिपिक विश्वास शिंदे यांनी पुरवली. त्यात घरपट्टी पाणीपट्टी 10 नंबर पावत्या, नोटीस बिल ,वसुली बिल ,चौकशी दरम्यान इतर दप्तर उपलब्ध करून दिले . चौकशी करतेवेळी सरसकट पूर्ण सतरा सभासदांच्या ग्रामपंचायत कर भरणा विषय पावत्या व इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात आली, त्यात काहिंच्या झेरॉक्स नव्हत्या तर काही अस्पष्ट असल्यामुळे पुढील चौकशी अहवाल पूर्ण होऊ शकला नाही. दोन दिवसात अहवाल  त्रुटीहिन पूर्ण करून वरिष्ठांकडे पुढील आदेशासाठी पाठविण्यात येईल. तसेच एक प्रत अहवाल तक्रारदार रविंद्र रघुनाथ धनगर यांना देऊ . चौकशी अधिकारी एस.टी.मोरे पंचायत समिती चोपडा यांनी   सांगितले.

1कोरोना काळात मी फार आजारी होती. बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बाकी भरण्यास उशीर झाला.

शोभा ठाकरे ग्रामपंचायत सदस्य वर्डी

2 कोरणा काळात माझा मुलगा फार आजारी होता घरातून निघने मुश्कील होते, तशातच मुलगा मयत झाल्यामुळे मी वेळेत बाकी भरू शकले नाही.

कस्तुराबाई भिल ग्रामपंचायत सदस्य.


अर्जात त्रुटी व अपूर्णतः असूनही वैद्य.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020/21, वार्ड क्रमांक 3 मधील उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यात निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारी अर्ज अनेक त्रुटी व  अपूर्णतः असूनही अर्ज वैद्य ठरवून निवडणूक लढवून विजय झालेले आहे.

 उमेदवाराने लिहून दिलेल्या प्रतिज्ञापत्रात व कार्यकारी दंडाधिकारी चोपडा यांच्या सही शिक्का नाही, उमेदवारी पत्रातील चिन्हाची मागणी त्यांची पतीच्या नावाने भरून

  पत्नी ची सही, ठेकेदार नसल्याचा दाखला वरही पत्नीची सही ,आचारसंहितेची माहिती व निवडणूक खर्चाबाबत नमुन्यावर पत्नीच्या सह्या असल्यामुळे उमेदवाराची कुठेच निवडणूक पत्रात सह्या नसल्यामुळे त्यांच्या अर्ज अवैध न ठरवता वैद्य ठरवून निवडून आलेले आहेत . उमेदवाराचे सदस्य पद कायदेशीर रित्या रद्द करून व निवडणूक निर्णय अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे 13 डिसेंबर 21 रोजी तक्रारदार सुरेश शालिग्राम पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने