*स्वातंत्र्य लढ्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे योगदान न विसरण्याजोगे... कॉम रेड अमृत महाजन*


 



*स्वातंत्र्य लढ्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे योगदान न विसरण्याजोगे...  कॉम रेड अमृत महाजन*

चोपडा दि.२७(प्रतिनिधी).. भारतीय स्वातंत्र्याची लढाई  1916 सालच्या खिलाफत आंदोलन ना पासून जोर धरत धरत पुढे काँग्रेसमध्ये महात्मा गांधींजिनचे नेतृत्वाचा उदय झाला .नंतर 1920 सालचे असहकार आंदोलन लगोलग..आयटक ची स्थापना नंतर पुढे  भारतीय कम्युनिस्ट पक्षाची 26डिसेंबर 1925रोजी स्थापना झाली. 1947सालापर्यंत कम्युनिस्टांनी काँग्रेस आंतर गत काँग्रेस सोशलिस्ट ग्रुप म्हणूनच काम  केले व कामगार शेतकऱ्यांची शोषण मुक्ती वर्गीय लढाया करत असताना ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य लढाईत ही हिरीरीने भागीदारी केली ..भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेचे ब्रिटिशांनी तर एवधा धसका घेतला की, त्यांनी कम्युनिस्ट नेत्यांवर  कानपुर कट मीरत कटानचे खटले भरून.. एम एन रॉय, का श्रीपाद अमृत

 डांगे ,पि सी जोशी ,डॉक्टर अधिकारी, एस एस मिरजकर शौकत उस्मनी, मुज्जफर अहमद बी टी रणदिवे, नंबुद्री पाद , आदी नेत्यांना दीर्घकाळ तुरुंगवास शिक्षा ठोठावल्या. त्यात 2 ब्रिटिश नागरिकही होते पण कम्युनिस्ट डगमगले नाहीत त्यांनीच 1930साली लाहोर काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला अशा तऱ्हेने कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापने ने भारतीय स्वातंत्र्य चळवळी ला नाव आयाम दिला. आणि पुढे राष्ट्रपिता महात्मा गांधींजिनचे नेतृत्वात देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, समता या त्रिसूत्री चे संविधान साऱ्या देश वाशियांनी स्वीकारली. स्वातंत्र्य चळवळीतील भागीदारी या त्याग व संघर्ष या परंपरेचा हा इतिहास कोणी विसरू शकत नाही असे प्रतीपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कामरेड अमृत महाजन यांनी पक्षाच्या 97 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने चोपडा येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत केले. बैठकीपूर्वी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड वासुदेव कोळी यांच्या हस्ते महात्मा फुलेनगर मध्ये विळा हातोडा चिन्हांकित लाल झेंडा अनावरण करण्यात आला व जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली त्यावेळी कॉम्रेड शांताराम पाटील गोरख वानखेडे ,प्रकाश रल ,सुमनबाई माळी, श्री दिगंबर माळी ,बाळू लोहार ,झाकिर अनेक  मान्यवर कार्यकर्ते हजर होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने