*108 रुग्णवाहिकेवरील कंत्राटी बीएएमएस डॉक्टरला 60 हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.. लाच लूचपत प्रतिबंध विभागाचा दणका.. भ्रष्टाचारींमध्ये प्रचंड खळबळ*


 


*108 रुग्णवाहिकेवरील कंत्राटी बीएएमएस डॉक्टरला 60 हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.. लाच लूचपत प्रतिबंध विभागाचा दणका.. भ्रष्टाचारींमध्ये प्रचंड खळबळ*

चाळीसगाव दि.२७(प्रतिनिधी)चाळीसगाव
रुग्णालयात कोरोना काळात भाडेतत्वावर लावेलेल्या रुग्णवाहिकेच्या बिलांची पडताळणी करून लागणारे पत्राच्या मोबादल्यात ६० हजाराची लाच घेणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे.
108 रुग्णवाहिकेवरील कंत्राटी बीएएमएस डॉक्टर मुश्ताक मोतेबार सैय्यद (घाट रोड, चौधरीवाडा, चाळीसगाव) यांना 60 हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे डॉ. सैय्यद यांच्या खाजगी क्लिनीकमध्ये लाच स्वीकारताना सोमवार, 27 डिसेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली.
चाळीसगावातील 29 वर्षीय तक्रारदार यांच्या दोन अँम्बुलन्स (रुग्णवाहीका) आहे. कोरोना काळात कोरोना रुग्ण चाळीसगाव तालुक्यातील गाव खेड्यातून तसेच चाळीसगाव येथुन जळगाव येथे ने-आण करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर, चाळीसगाव येथे भाडे तत्वावर लावण्यात आल्या होत्या. या रुग्णवाहिकांच्या सेवेच्या मोबदल्यात शासनाकडून बिल मिळणार असून या बिलांची पडताळणी करून त्याबाबत वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, चाळीसगाव यांचे सही-शिक्यानिशी लागणारे पत्र वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर, चाळीसगाव यांच्याकडून पडताळणी करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी 108 रुग्णवाहिकेवरील कंत्राटी डॉ. मुश्ताक मोतेबार सैय्यद यांनी सोमवारी लाच मागितली होती. एसीबीकडे तक्रार केल्यानंतर लाचेची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला.
हा सापळा नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अपर अधीक्षक सतीश डी. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस. पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सहा. फौजदार दिनेशसिंग पाटील, सहा. फौजदार सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलीस नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलीस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबलमहेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने