जयसिंग वाघ यांचे संविधान प्रबोधनपर कार्य प्रेरणादायी : देगलूरकर


 


जयसिंग वाघ यांचे संविधान प्रबोधनपर कार्य प्रेरणादायी   :  देगलूरकर

जळगाव दि.२६( प्रतिनिधी  )  येथील विविथ क्षेत्रात कार्यरत जयसिंग वाघ यांनी संविधानाच्या प्रबोधनार्थ केलेले लिखाण , दिलेली भाषणं , आयोजित केलेली विविध कार्यक्रम आजच्या प्रसंगी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन हदगाव जिल्हा नांदेड येथे दिनांक 25 डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या 6 व्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनात संयोजक चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले. वाघ यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना यंदाचा गुरू रविदास जीवन गौरव पुरस्कार संमेलनाचे अध्यक्ष तथा सिने कलावंत सुभाष सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला    या प्रसंगी तेलंगणा येथील प्रसिद्ध विद्रोही शाहीर मधू बावलकर , विद्रोही प्रबोधनकार कैलास राऊत , डॉ राजेंद्र धने आदी मान्यवर मंचावर हजर होती .

वाघ यांना या प्रसंगी शाल, बुके , सन्मानचिन्ह , सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले , त्यांचे उपस्थित साहित्यिक तथा रसिकांनि मोठ्या प्रमाणात स्वागत केले  संमेलनास कर्नाटक , तेलंगणा , छत्तीसगढ येथील प्रतिनिधी , महाराष्ट्रभरातून साहित्यिक मोठ्या संख्येने हजर होते. गुरु रविदास समता परिषद तर्फे पुढील 7 वे साहित्य संमेलन वाशीम येथे घेण्याचे जाहीर करण्यात आले .

------------------------------------

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने