*कोळी समाज विकास मंडळ भुसावळ आयोजीत "राज्यस्तरीय*कोळी समाज वधू वर* *परीचय सूची" चे प्रकाशन संपन्न.*
मनवेल ता.यावल दि.२६(प्रतिनिधी गोकुळ कोळी)दि.२६-१२-२०२१ (रविवार) रोजी कोळी मंगल कार्यालयात कोळी समाज वधुवर परीचय सुचिचे प्रकाशन भुसावळला कोळी समाज मंगल कार्यालयात करण्यात आले.
या प्रसंगी श्री. ज्ञानेश्र्वर सोनवणे ( *अध्यक्ष* कोळी समाज विकास मंडळ), श्री. नितिन सोनवणे ( *उपाध्यक्ष* कोळी समाज विकास मंडळ ),
शांताराम कोळी( *अध्यक्ष* राज्यस्तरीय कोळी समाज वधू वर मेळावा), ( श्री अभिमन्यु सोनवणे *मामा* ( *खजिनदार* कोळी समाज विकास मंडळ ),
चंद्रकांत सुर्यवंशी सर ( *सचिव* कोळी समाज विकास मंडळ ),
दिपक सोनवणे, भागवत सपकाळे, रोहिदास सोनवणे सर , दत्तात्रय सपकाळे, प्रदिप सपकाळे सर , गोकुळ सपकाळे, हेमंत कोळी, दिलीप कोळी(बाळूभाऊ), सोपान पवार, शशिकांत सपकाळे, कार्तिक सोनवणे. युगल सोनवणे.आदी समाज बांधव उपस्थित होते.
ज्या समाजबांधवांनी आपल्या विवाहेच्छूक उपवर मुलामुलींची नावनोंदणी केलेली असेल त्यांनी वधुवर परीचय पुस्तिका मंडळ कार्यालयामधून नेण्याची व्यवस्था करावी.ज्यांनी परीचय फॉर्म भरतांना पोस्ट/कुरीयरने पुस्तक पाठविण्याची नोंद केलेली असेल अशा दुरवरच्या समाजबांधवांची परीचय पुस्तिका कुरीयर/पोस्टाने पाठविण्यात येईल अशी माहीती संस्थे मार्फत देण्यात आली.