भारतात बूस्टर डोसला परवानगी..पण कधी घ्यावा हा डोस..?

 



भारतात  बूस्टर  डोसला परवानगी..पण कधी घ्यावा हा डोस..?


 गडचिरोली दि.२६( चक्रधर मेश्राम) कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या वाढता  भयानक प्रकोप पाहता  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देश वासियांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान  नरेंद्र मोदींनी ओमायक्रॉनमुळे कोरोना योद्ध्यांना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचं सांगितलं. मात्र कोरोना लसीकरण घेऊन जर  90  टक्के लोकांना ओमीवोक्रान  चा  प्रादुर्भाव होत असेल तर केंद्र शासनाने निर्णय घेऊन निर्गमित केलेल्या लसीकरण उपक्रमाचा फायदा तरी??  बूस्टर डोस 10 जानेवारीपासून सुरू करण्याचेही  त्यांनी बोलतांना जाहीर केलं आहे. त्यानुसार आता देशातील आरोग्य कर्मचारी आणि  60 वर्षांवरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे.  पण  कशासाठी हे शासनाने जाहीर केले पाहिजे. 

कोरोना काळात लसीकरण हे महत्वाचं शस्त्र असून सध्या सरकारकडून त्यावर भर दिलेला पाहायला मिळत आहे. अशातच आता भारतात बुस्टर डोस देण्याबाबत मोदींनी जाहीर केल्यानंतर भारत बायोटेकचे क्लिनिकल लीड डॉ. रॅशेस एल्ला यांनी ट्विट करत बुस्टर डोसबाबत माहिती दिली आहे.

लसीच्या दुसर्‍या डोसनंतर, तिसरा डोस दीर्घ अंतराने अधिक प्रभावी ठरतो. कारण तो जास्त काळ प्लाझ्मा आणि मेमरी सेल तयार करते म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती जास्त काळ टिकते. असं डॉ. रॅशेस एल्ला यांनी ट्विट करत म्हटलं आहे. डॉ रॅशेस एला म्हणाले की, दुसऱ्या डोसनंतर बूस्टर डोसचा 6 महिन्यांचं अंतर योग्य आहे. हे ओमिक्रॉनचा धोका कमी करण्यास देखील मदत करेल.  तरीही हे डॉ.  हेला यांचे थोतांड वक्तव्य आहे.  अशी जनमानसातील चर्चा आहे. 

दरम्यान 3 जानेवारी   सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनापासून देशभरातील लहान मुलांचं कोरोना लसीकरण सुरू होणार आहे.  त्यात 15 ते 18 या  वयोगटातील मुलांना लसीचा डोस दिला जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना विरोधातील लढाई आणखी मजबूत होईल. त्याच बरोबर शाळा -महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंताही कमी होईल. असंही पंतप्रधान मोदींनी जाहीर यावेळी म्हटलं आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने