गणपूरला दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम





गणपूरला दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम        

गणपूर,ता चोपडा ता 18(प्रतिनिधी): येथे दत्त जयंती निमित्त दत्त मंदिर,व दादाजी कुटिया येथे विविध कार्यक्रम उत्साहात साजरे झाले.           

दत्त मंदिरात लांडगे महाराज यांचे प्रवचन व भंडारा झाला.सायंकाळी दत्त पादुका व विशेष पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यावेळी गावात सडा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.दादाजी दरबार येथे भजन संध्या व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्याम उपदेशी मंडळ व दादाजी भक्तांनी परिश्रम घेतले............

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने