जगतगुरू अनंत विभूषित सत्पांथाचार्या श्री ज्ञानेश्वरदास महाराज गादीपती यांचे धानोरा परिसरात आगमन.. पावशेर केळीचे चांदीचे झाडं देऊन केळीला भाव यावेत म्हणून भाविकांना केली प्रार्थना..







 






जगतगुरू अनंत विभूषित  सत्पांथाचार्या  श्री ज्ञानेश्वरदास महाराज गादीपती यांचे धानोरा परिसरात आगमन.. पावशेर केळीचे चांदीचे झाडं देऊन केळीला भाव यावेत म्हणून भाविकांना केली प्रार्थना..

धानोरा ता. चोपडादि.१९(प्रतिनिधी पद्माकर महाजन):=फैजपूर संतकृपा आश्रम येथील ब्रह्मलीन  आचार्य जगन्नाथ महाराज यांच्या २० व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त जगतगुरू अनंत विभूषित  सत्पांथाचार्या  श्री ज्ञानेश्वरदास महाराज गादीपती प्रेरणा पिठ पिराणा गुजरात  वरून प्रथमच तीन दिवस खानदेश दौऱ्यावर जळगाव,फैजपूर नंतर धानोरा  प्र.अडावद येथे ५ वाजता सूर्यवंशी गुजर समाज संचालित काकासौ. सुकदेवराव भवसिंग पाटील समाज मंदिरात आगमन झाले त्यांच्या सोबत परम पूज्य योगी प्रेमदासजी बापू,पंचवटी,अमेरिका,सेवक नटू काका  व बाकी ट्रस्टी सोबत होते. 

समाजमंदिरा पासून ते सतपंथ मंदिरापर्यंत रथावर मिरवणूक काढून शोभायात्रा मध्ये कळस धारी युवती, फेटा धारी महिला,भजन वर नाचणारी मुखिगण, भक्ती गाण्यावर लेझिम, भक्तिमय वातावरणात तोफा मधून निघणारे फुल जास्त आकर्षक वाटत होते जणू काही गावात पंढरपुर निर्माण झाली असे वाटत होते. गांधी चौक धानोरा येथे रात्री ९. वाजता  जगतगुरू अनंत विभूषित श्री ज्ञानेश्वर दास महाराज यांचा केळी तुला करून धर्मसभा संपल्यानंतर उपस्थित भाविकांना केळीचा प्रसाद वाटण्यात आला.या सभेत महाराजांचा भव्य  नागरी सत्कार  सतपंथ ज्योत मंदिराचे अध्यक्ष बाजीराव वामन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला , व महाराज यांना पावशेर चांदीचे केळीचे झाड भेट  देण्यात आली  गावातील भाविकांना वाटले की केळीचे यावर्षी २०० ते २५० भाव देऊन सुधा व्यापारी केळी कापायला येत नाही त्याकरता  मनात प्रार्थना  करून केळीला चांगले दिवस यावे अशी भावना आहे ,कारण धानोरा परिसरात पूर्ण केळीचा बगीचा असतो.यावेळी महामंडलेश्वर १००८ श्री जनार्दन हरीजी महाराज फैजपूर ,योगी प्रेमदास बापू, नटू काका यांचाही भव्य सत्कार  समस्त सत पंथी अनुयायी व सर्व संस्थांचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला .कार्यक्रमाच्या वेळेस भुसावळ,जांभोरा,शेंदुर्णी,धानोरा परिसरआतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते 

यावेळेस  जगतगुरू सत्पांथाचार्य अनंत विभूषित ज्ञानेश्वर दास महाराज यांनी कलियुगात मनावरील ताण तणाव मुक्त होऊन मनुष्य सुखी व निरोगी जीवन जगण्यासाठी अहंकार सोडून , सेवा ,नम्रता,मुखी भगवंताचे नामस्मरण  नित्य आवश्यक आहे असे आपल्या अशिर्वाचानात सांगितले. यावेळी योगी प्रेमदास बापू व महामंडलेश्वर १००८ श्री जनार्दन हारिजी महाराज यांनी सुधा  उपस्थित भाविकांना आशीर्वादित केले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने