*जनता हायस्कूल मध्ये गणित दिवस उत्साहात साजरा*



 



*जनता हायस्कूल मध्ये गणित दिवस उत्साहात साजरा* 

 शिंदखेडा दि.२२(प्रतिनिधी रवि शिरसाठ) येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात निपून भारत अभियानांतर्गत  अंतर्गत 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला

      कार्यक्रम प्रसंगी संस्थाध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील ,सचिव श्रीमती मीरा मनोहर पाटील तसेच खजिनदार श्री देवेंद्र पोपटराव बोरसे , संचालक श्री प्रा. जितेंद्र पाटील शाळेच्या प्राचार्या श्रीमती एम डी बोरसे पर्यवेक्षक श्री उमेश देसले आदी मान्यवर उपस्थित होते तसेच मान्यवरांच्या हस्ते श्री श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

  या कार्यक्रमाचे औचित्य साधून तीन दिवस शाळेत विविध प्रकारचे गणितीय उपक्रम घेण्यात आले यात गणित चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा,गणितीय परिपाठ, रांगोळी स्पर्धा व गणितीय मॉडेल,असे अनेक प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांमधून विद्यार्थी स्पर्धकांना  क्रमांक देऊन  मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या सहभागातून कलाशिक्षक श्री एल पी सोनवणे यांनी गणित दिन नाव तयार केले विद्यार्थ्यांना गणित विषया विषयी माहिती व हा दिन गणित दिवस म्हणून का साजरा केला जातो ही माहिती गणित शिक्षक श्री बी जे पाटील व श्री डी एच सोनवणे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली तसेच जयकुल गिरासे व कृपा नयन कुमार देसले या विद्यार्थ्यांनी श्रीनिवास रामानुजन यांचा जीवन परिचय व त्यांचे गणित विषयातील कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणित शिक्षक श्री ए टी पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार श्री बी जे पाटील यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री आर पी वाघ, श्री सी व्ही पाटील ,श्री ए सी मारणार ,श्रीमती एन जे देसले, श्रीमती पी एस पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री मनोज मराठे ,श्री अमोल देसले आदींचे सहकार्य लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने