येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भगवा फडकवणार..जि.प.सदस्य प्रतापराव पाटील


 



येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भगवा फडकवणार..जि.प.सदस्य प्रतापराव पाटील


जळगाव दि.२२ (प्रतिनिधी)*येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भगवा फडकवणार अशी युवासैनिकांची ग्वाही**जळगाव व धरणगाव तालुका युवासेना बैठक उत्साहात संपन्न*


याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ पाटील यांनी मार्गदर्शन करताना युवा सेना पाया आहे. युवकांनी प्रत्येक गावात युवा शाखा उघडाव्यात, युवा सैनिक सदस्य नोंदणी करावी.परिसरातील लोकांच्या समस्यांचे निराकरण करावे, त्यासाठी लागणारी सर्व ती मदत आम्ही करू. श्रमिक कार्ड नोंदणी, रेशन कार्ड, आरोग्य कार्ड नोंदणी करावी. महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ना. गुलाबरावजी पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात भरभरून निधी आलेला आहे. आपल्या मतदारसंघातील सुस्थितील रस्त्यांची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. अनेक पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन कामे सुरू आहेत. 


आपण प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि गणात युवा सेनेचा स्वतंत्र मेळावा घेऊ. प्रत्येक गावात सोशल मीडिया प्रमुख नेमावा. प्रत्येक बुथवर आपले 10 कार्यकर्ते ऍक्टिव्ह करा.उपस्थित युवा सैनिकांना प्रोत्साहन देताना संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, सचिन तेंडुलकर यांनी तरुणपणी केलेल्या कार्यामुळे त्यांचे नाव अजरामर झाले आहेत अशी उदाहरणे दिली. 

 तुमच्या कामामुळे पद तुमच्यापर्यंत चालत येईल. निरपेक्ष काम करा, काम करणाऱ्या व्यक्तीला पद मिळतेच. 

पर्यावरण मंत्री ना.आदित्यजी ठाकरे साहेबांनी युवा सेनेतूनच कामाची सुरुवात केली आज ते कॅबिनेट मंत्री आहेत. विराजभाऊंनी 3 ते 4 वर्षे कोणत्याही पदाची अपेक्षा न करता शिवसेनेचे काम केले आज ते युवा सेनेचे प्रदेश सहसचिव म्हणून कार्य करत आहेत.  त्यामुळे मरगळ झटका आणि जोमाने कामाला लागा असे प्रतिपादन केले. 

या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील, जळगाव जिल्हा युवा सेना जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, प्रदेश सहसचिव विराज कवाडीया, माजी पंस सभापती मुकुंदभाऊ ननावरे, विजयभाऊ लाड, धरणगाव युवा सेना तालुकाप्रमुख चेतन पाटील, जळगाव युवासेना तालुकाप्रमुख सचिन चौधरी व युवासेना पदाधिकारी व 150 हुन अधिक युवा सैनिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने