सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे एक दिवस काम बंद

 





सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे एक दिवस काम बंद

  मनवेल ता.यावल दि.२२(प्रतिनिधी गोकुळ कोळी) : सरपंच परिषद मुंबई ने केलेल्या आवाहनला प्रतिसाद देत मनवेल ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी पाठीबा देत ग्रामपंचायत बंद ठेवले.

ग्रामीण भागातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना येत असलेल्या विविध समस्यांचा अडचणी समोर येत आहे याकडे शासनाने या समस्यांकडे लक्ष वेधावे म्हणून एक दिवस ग्रामपंचायत बंद ठेवण्यात आली यात ग्रामपंचायत कामकाज ठप्प करुन सहभागी झाले.

यावेळी सरपंच जयसिंग सोनवणे, उपसरपंच मिनाक्षी पाटील, ग्रामपंचायत सदस्य मगंलसिग पाटील, नरहर भिल, विकास पाटील,कमलबाई मोरे उपस्थित होते.

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांनी घेतलेल्या काम बंद मध्ये ग्रामसेवक संघटना सहभागी असल्यामुळे दिवसभर कामकाज ठप्प होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने