सी आय एस एफ जवान विकास पाटील यांचे हृदयविकाराने निधन ..पिळोदा खुर्द येथे आज अंत्यसंस्कार

 



सी आय एस एफ जवान विकास पाटील यांचे हृदयविकाराने निधन  ..पिळोदा खुर्द येथे आज अंत्यसंस्कार


मनवेल ता,यावल दि.२२( प्रतिनिधी गोकुळ कोळी ): चंद्रपुर येथे सेवा बजावत असताना यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द येथील सी.आय.एस.एफचे जवान विकास प्रल्हाद पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने चंद्रपूर येथे निधन झाले असून त्याच्या वर  दि.२२ डीसेबंर रोजी पिळोदा खुर्द तालुका यावल या गावी सकाळी नऊ वाजता अंत्यसंसस्कार करण्यात येणार आहे.

गेल्या तीस वर्षापासून विकास प्रल्हाद पाटील सिमेवर देश सेवा करीत असून त्यांच्या निधनाची वार्ता  वार्ता गावात पसरल्याने गाव शोकाकुल  झाले आहे.

त्याच्या पत्शात पत्नी, दोन मुल, तीन भाऊ ,असा परीवार आहे.कैलास प्रल्हाद पाटील यांचे लहान बंधू असून शरद प्रल्हाद व विकास प्रल्हाद आर्मी मध्येच नोकरी करतात या कुटुंबावर जो काळाने घाला घातला त्याबद्दल संपूर्ण परिसर अशोक मुळे झालेला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने