२३ डिसेंबर २०२१ रोजी आझाद मैदान मुंबई येथे व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्यावतीने धरणे सत्याग्रह आंदोलनचे आयोजन






 २३ डिसेंबर २०२१ रोजी आझाद मैदान मुंबई येथे व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्यावतीने धरणे सत्याग्रह आंदोलनचे आयोजन

मुंबई दि.२२(शांताराम गुडेकर)दिवसेंदिवस विविध व्यसनांचा विळखा महाराष्ट्राला घट्ट आवळत चालला आहे. लाखो कुटुंबे दरसाल पूर्णपणे उध्वस्त होत आहेत. याबाबतीत सरकारला वेळोवेळी निवेदने व पाठपुरावा व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या वतीने सुरू आहे.खालील मागण्यांकरीता दि.२३ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी १ ते ४ या वेळात ७ वे राज्यस्तरीय धरणे सत्याग्रह आंदोलन आयोजित केले आहे.१)व्यसनमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी.२) चंद्रपूर जिल्ह्यातील उठविलेली दारूबंदी त्वरित मागे घ्यावी.३) धान्यापासून दारू निर्मितीला दिलेल्या परवानगी रहित कराव्यात.४)विदेशी दारूवरील ३००% कर कमी करून १५०% करण्यात आला आहे, तो कर पूर्वस्थित करावा.५) किरणा दुकानावर वाईन विक्री बाबतच्या चर्चा बंद करून राज्याचे बिघडलेले समाज स्वाथ्य दुरुस्त करण्याच्या उपाययोजना लागू कराव्यात, व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाने सातत्याने केलेल्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार व कार्यवाही करावी.या मागण्यासाठी हे आंदोलन असल्याचे वर्षा विद्या विलास,अविनाश पाटील

 राज्य निमंत्रक,व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंच यांनी सांगितले. तरी या आंदोलनमध्ये मोठया संख्येने उपस्थित रहा असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने