*चोपडा महाविद्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा*
चोपडा दि.१८(प्रतिनिधी): येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय अल्पसंख्यांक दिनानिमित्त 'अल्पसंख्यांक आणि भारतीय संविधान' या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री. डी. डी. कर्दपवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे परिचय व प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेश वाघ यांनी केले.
या व्याख्यानप्रसंगी श्री. डी. डी. कर्दपवार यांनी 'अल्पसंख्यांक आणि भारतीय संविधान' या विषयावर बोलतांना ‘भारतीय संविधानातील विविध कलमांच्या आधारे अल्पसंख्यांकांचे अधिकार स्पष्ट केले. अल्पसंख्यांक देखील देशाचे नागरिक असून देशाच्या विकासात त्यांचा समान वाटा आहे. त्यामुळे त्यांना समान वागणूक समाजाकडून मिळणे आवश्यक आहे. भारतीय संविधानामुळेच भारतीय समाजातील सामाजिक, आर्थिक व राजकीय भेदभाव संपुष्टात आले असून सर्व नागरिकांना समान अधिकार प्राप्त झालेला आहे असे मत त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.'
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. एन. सोनवणे म्हणाले की, ‘देशातील अल्पसंख्यांक समुदायाच्या विशेष अधिकारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सर्व नागरिकांची असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी सामुदायिक प्रयत्न केले पाहिजे.'
या कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शैलेश वाघ यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात प्राध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.