*चोपडा विधानसभा मतदारसंघाचा विकास.. तुफानी एक्सप्रेस सारखा मनाप्रमाणे वेळेची उणीव भरणारा.. चौफेर कामांच्या चक्रीवादळाने काहिंच्या डोळ्यांची होतेंय उघडझाप.. म्हणून त्यांना रस्ता नाही खड्डेच दिसतायं..माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांचे झणझणीत उद्गगार..*
चोपडा दि. १८ (प्रतिनिधी)
*चोपडा तालुक्यात वर्डी भागांत १ कोटी १४ लाखांच्या कामांचे भूमिपूजन.. तर पिंप्री,कमळगाव,विष्णापूर ,बोरमळी,कोळंबा,वडगाव भागात कोट्यावधींच्या रस्ता कामांचा शुभारंभ आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या शुभहस्ते व माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या खास उपस्थितीत पार पडला.
यावेळी माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांनी सांगितले की, चोपडा तालुक्याचा संपूर्ण विकास हेच आपलं ध्येय असून रस्त्यांच्या प्राधान्याप्रमाणे आदिवासी भागातील कधींही कोणीही ढूंकून पाहिले नाही अशा कामांना हि जोमाने प्राधान्य देण्यात आले आहे.विरोधक विरोध करतीलच त्यांनी त्यांचें काम करावे मला माझे म्हणजे जनतेचे कामे करावयाची आहेत.जनतेने सत्यता पडताळून आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन केले.
आजच्या भूमिपूजन कार्यक्रमात
पिंप्री ते कमळगांव रस्ता ग्रामा. १४ वर २ किमी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे,वर्डी ते उनपदेव रस्ता प्रजिमा ५७ वर ३.५ कि.मी. रस्तामजबुतीकरण व डांबरीकरण करणे वर्डी येथे प्रभाग ४ मध्ये गटारी बांधणेवर्डी येथे प्रभाग ५ मध्ये गटारी बांधणे वर्डी येथे सीएससी सेंटर बांधणे या चार कामांचा भूमिपूजन वर्डी येथे झाले .
यावेळी महीला जिल्हाप्रमुख रोहीणी पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील बिटवा, जि प सदस्य हरीश पाटील, तालुका संघटक सुकलाल कोळी, ए के गंभीर सर, माणिकचंद महाजन, सुनिल पाटील, गणेश पाटील, अनिल बाविस्कर, नामदेव पाटील, पी आर माळी सर, सचिन पाटील, किशोर पाटील,Vardi रविन्द्र पाटील माजी सरपंच राजू ठाकरे भगवान कोली माजी उपसरपंच सालुंखे सर मंगल इंगळे, प्रमोद बाविस्कर, जितेंद्र कोळी,व समस्त शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक चोपडा विधानसभा मतदार संघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.