कोकण कन्या तसेच बोरिवली, गोराई येथील कोकणचा मान उंचवणारी कु.सायली नारायण सांवत हिने पटकावले द्वितीय रनरअप व बेस्ट रँम्पवाँक विजेतेपद


 







कोकण कन्या तसेच बोरिवली, गोराई येथील कोकणचा मान उंचवणारी कु.सायली नारायण सांवत हिने पटकावले द्वितीय रनरअप व बेस्ट रँम्पवाँक विजेतेपद 


मुंबई दि.२३ (शांताराम गुडेकर)

      गुरुग्राम, येथील Kingdom of Dreams येथे शनिवारी (दि.१८ डिसेंबर २०२१)पार पडलेल्या "मिस डायडेम इंडिया २०२१ " च्या "मिस इंडिया " या स्पर्धेत पोखरण, जिल्हा- सिंधुदुर्गची कोकण कन्या तसेच बोरिवली, गोराई येथील कोकणचा मान उंचवणारी कु.सायली नारायण सांवत हिने  द्वितीय रनरअप व बेस्ट रँम्पवाँक हे विजेतेपद पटकावले.सायलीचे मूळ शालेय शिक्षण हे गोराई, बोरिवली येथील सेंट रॉक्स हायस्कूल मधून झाले आहे.विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयाची ती माजी विद्यार्थिनी असून,सानपाडा- नवी मुंबई येथील ATDC या फॅशन डीजाईनिंग संस्थेमधून तिने पदवी प्राप्त केली आहे आणि यांच्या माध्यमातून  तिला पुढे या स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले गेले. ATDC मधील शिक्षक आणि तिचे कुटुंब यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे मी इथे पोहचू शकले असे सांगून सायलीने त्यांचे  आभार व्यक्त केले. याबाबत सर्व स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.एका मध्यम वर्गीय कुटुंबातील सायलीने हा उच्च पातळीवरील सन्मान मिळवल्याने तिचे अनेकांकडून शुभेच्छा देत अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने