शेताच्या नोंदी लावण्यासाठी शासकीय फी भरुनही अव्वल कारकुनचा मनमानी कारभार

 



शेताच्या नोंदी लावण्यासाठी शासकीय फी भरुनही अव्वल कारकुनचा मनमानी कारभार

मनवेल ता.यावल दि.२३ (प्रतिनिधी गोकुळ कोळी) शाषकीय फी भरुनही यावल तहसिल कार्यलयातील अव्वल कारकुन शेताच्या नोंदी लावत नसल्याची तक्रार मनवेल येथील शेतकरी अनिल पाटील यांनी यावल तहसिलदार, फैजपुर प्रांत व चोपडा आमदार लताताई सोनवणे यांचाकडे केली  आहे.

मनवेल येथील शेतकरी अनिल श्रावण पाटील यांचा मालकीचा गट न.२६७, २६४ व २७६ या शेताच्या नोंदी लावण्यासाठी यावल तहसिलदार कार्यलय मधील अव्वल कारकुन यांच्याकडे   अर्ज केला असून शाषकीय फी भरुन गटाच्या नोंदी लावाण्याची विंनती केली असून मनमानी करीत आहे.

शेताच्या नोंदी लावण्यासाठी पैसाची मागणी केली व पैसे देण्यासाठी नकार दिला असता तुमच्या कडुन होईल ते करा अशी उमर्ट भाषा वापरुन मनमानी करीत आर्थिक पिळवणूक करीत आहे तरी अशा भर्ष्ट अधिकारीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी अनिल श्रावण पाटील यांनी लेखी निवेदन द्वारे केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने