अभियंता विनीत बागडे यांचा संशयास्पद मृत्यू.? घातपात झाला असल्याच्या चर्चेला आले उधाण
.
गडचिरोली दि.०१( चक्रधर मेश्राम) :
गडचिरोली कोटगल बॅरेजवर रात्रपाळीला सुपरविझनचे काम करणारे, अभियंता विनीत बागडे यांचा झालेला मृत्यू हा संशयास्पद स्वरूपाचा असून विनीत बागडे यांच्या संशयास्पद मृत्यूवर कोटगल गावात आणि सभोवतालच्या परिसरातील लोकात तर्क वितर्क लावले जात असून, त्यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीची मागणी सगळीकडे केली जात आहे. अभियंता विनीत बागडे मृत्यू समयी यांच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या जखम नसून त्याच्या डोक्याला गंभिर स्वरूपाचा मार असल्यामुळे त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन, मेंदूचे तुकडे.. .तुकडे झाल्याचे चर्चिले जात आहे. कोटगल ब्यारेजवर गंभीर स्वरूपाची घटना घडली असताना सुध्दा या घटनेची साधी पोलीस चोकशी सुध्दा झालेली नाही. त्यामुळे हा नियोजित घात पताचा प्रकार तर नसेल ना.? अशा चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे. त्यामुळे पोलीसांनी या गंभीर प्रकरणी लक्ष वेधून योग्य चौकशी सुरू करावी अशी मागणी जिल्ह्यातील विविध संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.