*आ. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या वरदहस्ते दिव्यांगत्व तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबीर उद्घाटन.. शेकडोंनी घेतला लाभ*
चोपडा दि.०१ (प्रतिनिधी )चोपडा उपजिल्हा रुग्णालय नेत्र शस्त्रक्रिया शिबीर व अपंगत्व तपासणी शिबिराचे उदघाटन आ. सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. आ. लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी अपंग बांधवांना दर बुधवारी जळगाव येथे अपंगत्व तपासणीसाठी जावे लागत असल्याने त्यांना होणार शारीरिक व आर्थिक त्रासाचा विचार करून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दर १५ दिवसांनी अपंगत्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हा शल्य चिकित्सक श्री. एन. एस. चव्हाण यांना केली होती त्यानुसार दि. ३०/११/२०२१ रोजी अपंगत्व तपासणी शिबिराचे उदघाटन झाल्याने चोपडा तालुक्यातील अपंग बांधवांनी समाधान व्यक्त केले. या शिबिरात जवळजवळ ३२८ अपंग बांधवांची तपासणी करण्यात आली तसेच शिवसेना शाखा गणपूर तर्फे दि. २३/१०/२०२१ रोजी १०० रुग्णांची नेत्र तपासणी केली होती त्यातील ३७ रुग्णांना शस्त्रक्रियांची आवश्यकता असल्याने आढळून आल्याने त्यातील २० रुग्णावर ३०/११/२०२१ रोजी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या वेळी उपस्थित रुग्णांची व अपंग बांधवांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. प्रसंगी महिला जिल्हाप्रमुख. रोहिणीताई पाटील, तालुकाप्रमुख.राजेंद्र पाटील, महिला तालुकाप्रमुख. मंगलाताई पाटील, माजी उप सभापती व पं. स. सदस्य एम. व्ही. पाटील सर, माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक किशोर चौधरी नगरसेविका संध्याताई महाजन, तालुका संघटक सुकलाल कोळी, उपतालुकाप्रमुख नितीन पाटील, युवासेना तालुका प्रमुख गोपाळ चौधरी, सुनील पाटील, गणेश पाटील, मुकेश कोळी, गुलाब कोळी, लक्ष्मण मराठे, द्यानेश्वर राजपूत, सिव्हिल सर्जन डॉ.एन.एस.चव्हाण, डॉ. मनोज पाटील, डॉ. पंकज पाटील, डॉ. तृप्ती पाटील, डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.