शिरसाड ग्रामपंचायत तर्फे तेजस पाटील यांचा स्वच्छ भारत अभियानात जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार


 शिरसाड ग्रामपंचायत तर्फे तेजस पाटील यांचा स्वच्छ भारत अभियानात जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार 

मनवेल ता.यावल दि २९(वार्ताहर) :- शिरसाड तालुका यावल येथील युवा ग्रामपंचायत सदस्य तथा नेहरू युवा केंद्र यावल तालुका समन्वयक तेजस धनंजय पाटील यांचा स्वच्छ भारत अभियानात जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल शिरसाड ग्रामपंचायत तर्फे मासिक मीटिंग मध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच दीपक इंगळे, उपसरपंच राजू सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य उल्हास ढाके, निसार तडवी, गायत्री सोनवणे, कविता सोनवणे, विमलबाई अलकरी,ज्योती सोनवणे, ग्रामसेवक दीपक तायडे भाऊसाहेब, ग्रामपंचायत कर्मचारी टेकचंद काटे, नितीन कोळी उपस्थित होते. तेजस पाटील यांना स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला ही बाब गावासाठी गौरवाची बाब आहे असे ग्रामसेवक यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने