चोपडा पीपल्स् को. ऑप. बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलदास छगनलाल गुजराथी काकाजींचे वृद्धापकाळाने निधन..आज रात्री ९:०० वाजता अंत्ययात्रा
चोपडा दि.२९ (प्रतिनिधी): शहरातील रहिवासीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रखर कार्यकर्ते व चोपडा पीपल्स् को. ऑप. बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलदास छगनलाल गुजराथी ( व्ही. सी. अंकल )यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वृध्दापकाळामुळेआज दुपारी १ वाजता दुःखद निधन झाले आहे.त्याच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांचीअंत्ययात्रा आज *रात्री ९ वाजता**डॉ. हेडगेवार चौक, गुजराथी गल्ली* येथून निघणार आहे.
विठ्ठलदास गुजराथी हे सर्वच काकाजी म्हणून परिचित होते.त्यांचा स्वभाव अंत्यंत मन मिळावू होता ते चोपडा कसबे सोसायटीचे माजी चेअरमन,चोपडे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष,
श्री व्यंकटेश बालाजी मंदिर संस्थान चे मुख्य ट्रस्टी,
दसा दिसावल गुजराथी समाजाचे अध्यक्ष होते.त्याच्या उत्कृष्ट कार्याचा ठसा अनेकांच्या मनात घर करून गेला आहे.ते
प्रविणभाई विठ्ठलदास गुजराथी व ज्योतिकुमार विठ्ठलदास गुजराथी यांचे वडील होत