जिल्हा बॅंक संचालक घनःश्याम ओंकारलाल अग्रवाल यांचा चोपडा कसबे वि.का.सहकारी सोसायटी तर्फे सत्कार




 जिल्हा बॅंक संचालक घनःश्याम ओंकारलाल  अग्रवाल यांचा चोपडा कसबे वि.का.सहकारी सोसायटी तर्फे सत्कार

चोपडा दि.०२(प्रतिनिधी) - तालुक्यातून चोपडा तालुका सोसायटी मतदार संघातून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेंच्या नुकतेच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले घनःश्याम ओंकारलाल अग्रवाल यांचा सत्कार चोपडा कसबे वि.का.सहकारी सोसायटी तर्फे करण्यात आला.कसबे सोसायटीच्या प्रतिनिधित्वावर अग्रवाल यशस्वी झाले आहेत.त्यांचा सत्कार सोसायटीचे चेअरमन प्रवीण गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले.यावेळी व्हा.चेअरमन युवराज महाजन,संचालक श्रीकांत नेवे,डॅा.सुभाष देसाई, नारायण बाविस्कर,भास्करराव पाटील, प्रवीण देशमुख, गोपाळ चौधरी,महेंद्र शिरसाठ,दत्तु मराठे,विमलबाई देशमुख, संदीप धारपवार आदी उपस्थित होते.सोसायटीच्या कर्मचारी वृंदातर्फे देखील यावेळी सत्कार करण्यात आला.आपल्या सत्काराला उत्तर देतांना अग्रवाल म्हणाले की,कसबे सोसायटीने मला प्रतिनिधित्व दिले म्हणूनच जिल्हा बॅकेवर मी निवडून येवू शकलो.शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी माझा प्रयत्न राहिल.कृषी कर्ज काढताना शेतकऱ्यांना असलेली ए.टी.एम.कार्डच्या सक्तीचा निर्णय शिथील करण्याचा प्रयास राहिल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने