श्री संत तानाजी महाराज मठ अमळनेर येथे संत ज्ञानोबारायांचा ७२५ वा समाधी सोहळा जल्लोषात साजरा







 *श्री संत तानाजी महाराज मठ अमळनेर येथे संत ज्ञानोबारायांचा ७२५ वा समाधी सोहळा जल्लोषात साजरा*

    अमळनेर दि.०२ (प्रतिनिधी): श्री संत तानाजी महाराज समाधी मंदिर,पैलाढ अमळनेर येथे संत ज्ञानोबारायांचा ७२५ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,हभप भानुदास महाराज यांच्या नियोजनात संत तानाजी महाराज यांचे विटनेर येथील वंशज महंत प्रा.हभप सुशिल महाराज,विटनेरकर यांचे हरिकीर्तन संपन्न झाले,कीर्तनात महाराजांनी ज्ञानोबाराय यांचा समाधी सोहळ्याचा प्रसंग वर्णन करत काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता केली.

तदनंतर ज्ञानेश्वर माऊली यांच्या मंदिरात माऊलींच्या मूर्तीवर पसायदान म्हणून पुष्पवृष्टी करून समाधी सोहळा साजरा करण्यात आला,महाआरती नंतर पुरणपोळी चा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते

 या कार्यक्रमासाठी हभप नवनीत महाराज,हभप हरीश महाराज,सडावन ,पैलाढ,तांबेपुरा येथील भजनी मंडळ उपस्थित होती,कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडावा यासाठी हभप भानुदास महाराज,हभप अरुण बापू,हभप बागले मामा समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ पैलाढ यांनि मेहनत घेतली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने