चोपडा शहरात देह व्यापार करणाऱ्या अड्ड्यावर धाड..११ महिलांवर गुन्हा.. २३ तरुणींची सुटका ..*पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता कारभार

 



काल्पनिक चित्र
*
चोपडा शहरात देह व्यापार करणाऱ्या अड्ड्यावर धाड..११ महिलांवर गुन्हा.. २३ तरुणींची सुटका ..*पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता कारभार

चोपडा दि.२३(प्रतिनिधी ) शहरातील एका परिसरातील
कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून २३ तरुणींची सुटका केली असून यात ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा शहरातील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पोलीसांनी छापा टाकून तब्बल २३ तरूणींची सुटका करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात अवैधरित्या कुंटनखाना सुरू असल्याची गोपनिय माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले यांना मिळाली. त्यानुसार चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण आणि चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्यासह त्यांच्या पथकाने बुधवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या पाठीमागच्या परिसरात असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकला.यात जिल्ह्यासह परराज्यातील तब्बल २३ तरूणी आढळून आलेत. सर्व तरूणींचे सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणात कुंटनखाना चालविणाऱ्या ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी वेश्या व्यवसाय करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आल्याने पंचा समक्ष जप्त करण्यात आले. या परीसरात मध्यप्रदेश, आंध्रा, पश्चिम बंगाल, कलकत्तासह नेपाळमधील तरूणींना आणले जात असून त्यांच्याकडून देहव्यापार केल्या जात आहे. वारंवार कारवाया होऊन सुद्धा या परिसरात देह व्यापार केला जात होता

ही धडक कारवाई
मा.सहा पोलीस अधिक्षक श्री कृषिकेश रावले सर, उपविभागीय पोलीस अधिकारी
चोपडा,. पोलीस निरीक्षक श्री अवतारसिंग चव्हाण चोपडा शहर ,मा पोलिस निरिक्षक श्री देविदास कुनगर चोपडा ग्रामीण पो.स्टे,सपोनिः/ अजित सावळे चोपडा शहर पोस्टे (5) सपोनि संतोष चव्हाण नेम चोपड़ा शहर
पोउपनि/ घनश्याम तांबे चोपडा शहर पोस्टे मा. सहा पोलीस अधिक्षक श्री कृषिकेश रावले सर, उपविभागीय पोलीस अधिकारी चोपड पोलीस निरीक्षक श्री अवतारसिंग चव्हाण चोपडा शहर व पोलिस कर्मचारी यांनी केली.

यातील  11 आरोपींनी कुंटणखाण्याचे चालक व मालक असुन ते स्त्री व मुली यांना स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलांना स्वत:चे राहते घरात ठेवून त्यांना
बळजबरीने देहविक्री करण्यास भाग पाडून कुंटनखाणा चालवुन त्यातुन मिळालेल्या आर्थीक उत्पन्नावर ते | उपजिविका चालविताना रंगेहात मिळुन आले म्हणुन गुन्हा दाखल अमलदार सपोनि/ अजित सावळे यांनी केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने