*चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाची 31 डिसेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन*
चोपडा दि.२३(प्रतिनिधी) - येथिल ज्येष्ठ नागरिक संघाची 31 डिसेंबर 2021शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजता नारायण वाडीतील विठ्ठल मंदिर समोरील ज्येष्ठ नागरिक संघाचे नूतन सभागृह मध्ये 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अजेंडा मधील विषय सुचितील विषया नुसार कामकाज होणार आहे.
सदर बैठक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय करोडपती यांचे अध्यक्षते खाली होणार असून संघाच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाने याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सचिव, सहसचिव , व बांधकाम समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष यांनी केलेले आहे.
सदर बैठकिस महाराष्ट्र शासनाने कोरोना - 19 संदर्भात दिलेल्या सुचनांचे पालन करणेत येईल व सभासदांनीही तशी दक्षता घ्यावी असेही सूचित करण्यात आलेले आहे.