माती ,पीक आणि कचऱ्याचे भविष्यात नियोजन गरजेचे .. विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन .. नियोजित बायो सी एन जी व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजन









 माती ,पीक आणि कचऱ्याचे भविष्यात नियोजन गरजेचे ..   विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन   ..  नियोजित बायो सी एन जी व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजन         

गणपूर ,ता .चोपडा ता 18 (प्रतिनिधी): भविष्यात अनेक  बदल घडणार असून पर्यावरण आणि समृद्ध शेतीसाठी माती ,पीक आणि गोळा होणाऱ्या कचऱ्याचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी चोपडा येथे नियोजित बायो सी एन जी व सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलतांना व्यक्त केले.                                  

चोपडा शहरालगत यावल रस्त्या शेजारी मीरा क्लीन फ्युएल्स लि., संयोग बायो क्लीन फ्युएल्स प्रा लि व चोपडा येथील चंद्रभूमी कृषी विकास प्रोड्युसर कंपनी लि च्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी माजी आमदार कैलास पाटील,जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष ऍड संदीप पाटील,जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल,नगराध्यक्षा मानिषाताई चौधरी ,धुळे जिल्हा शिवसेना प्रमुख हेमंत साळुंखे प्रमुख पाहुणे होते.  कंपनी प्रवर्तक भूषण सोनवणे ,व बीपीनचंद्र बागल व एम व्ही पी यांनी मान्यवरांचा सत्कार केला.प्रणव ठाकरे यांनी प्रास्ताविक केले.हेमंत साळुंखे ,सिनियर बी डी ए योगेश पवार ,बी डी ए गजेंद्र सोनवणे ,हेमंत पाटील यांनी कंपनीच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड बाळकृष्ण पाटील यांनी केले.उपस्थितांचे आभार भूषण सोनवणे ,बीपीनचंद्र बागल यांनी मानले.कार्यक्रमाला चोसाकाचे अध्यक्ष अतुल ठाकरे,पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी,बाजार समितीचे अध्यक्ष दिनकरराव देशमुख,माजी उप प्राचार्य जगदीश पठार,तालुका कृषी अधिकारी प्रशांत देसाई ,भरत पाटील,रमाकांत बोरसे, राजेंद्र पाटील,प्रहार चे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,सुनील जैन,एम पी ओ देवाजी वंजारी,दीपक पाटील,स्वप्नील शहा,महेश माळी, उमेश पाटील,हेमंत पाटील,नरेंद्र ब्राम्हणकर,जितेंद्र अहिरे,राहुल माळी, विजय बारी,सुनील जैन,ग्राम उद्योजक व शेतकरी उपस्थित होते................

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने