महाराष्ट्र सुशिक्षित बेरोजगार आघाडी आयोजित उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन शिबीर संपन्न
नाशिक दि.१९ (प्रतिनिधी दिलीप पाटील):नाशिक शहरातील व जिल्ह्यातील *सुशिक्षित बेरोजगारांना घरगुती उद्योग-व्यवसाय* सुरु करून देण्याचा अनोखा उपक्रम *महाराष्ट्र सुशिक्षित बेरोजगार आघाडी* च्या माध्यमातुन सुरू करण्यात आला आहे.
यानिमित्ताने आज दुपारी नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी *"उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन शिबीर"* आयोजित करण्यात आले होते... याशिबिराप्रसंगी *◆घरगुती उद्योग प्रोडक्शन चे संचालक श्रीमान. आनंद कदम (मुंबई)◆ फायनान्स कंपनी चे समन्वयक श्रीमान. तुषार मोहिते (पालघर) ◆ बार्टी चे समतादूत श्रीमान. भिमराव चव्हाण* आदीजन प्रमुख पाहुणे हे बेरोजगारांना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते._
शिबिराचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र सुशिक्षित बेरोजगार आघाडी चे संस्थापक अध्यक्ष *सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड* हे होते. शिबिराचे ★प्रास्ताविक प्रकाशपर्व परिवाराचे सचिव *श्रीमान. भाऊ केदारे* यांनी केले तर ★सुत्रसंचालन महाराष्ट्र सुशिक्षित बेरोजगार आघाडी च्या *जिल्हा प्रतिनिधी सौ.मंजुषाताई जगताप* यांनी केले. उद्योग व्यवसाय मार्गदर्शन शिबिरात उपस्थित सुशिक्षित बेरोजगारांची नाव नोंदणी करण्याची जबाबदारी महाराष्ट्र सुशिक्षित बेरोजगार आघाडी चे *नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख ●श्रीमान. दिलिप पाटील* व नाशिक शहर संपर्क प्रमुख *●श्रीमान.सचिन जाधव* यांनी यशस्वीपणे पार पाडली.याशिबिराप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील शेकडोंच्या संख्येने बेरोजगार युवक /युवती / महिला /पुरुष आवर्जून उपस्थित होते.
-