*मी प्रत्यक्ष कामांचेच नारळ फोडतो, पोकळ आश्वासने देत नाही. - जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील*
धरणगाव दि.२८ ( प्रतिनिधी)
धार येथे केटीवेअर बंधारा आणि पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते पार पडले यावेळी ते बोलत होते.
धार वासीयांची केटी वेअर बंधाऱ्यांची मागणी अनेक दिवसांची होती, त्याचे भूमिपूजन करून काम सुरू करण्यास मला आनंद होत आहे. या बंधाऱ्यामुळे धार गावातील पिण्यासाठी तसेच आजूबाजूच्या शेतीसाठी मोठा फायदा होणार आहे. धार गावाची पाणीपुरवठा योजना ज्या टुबेलवर आहे, त्या टुबेलसाठी हा बंधारा वरदान ठरेल. महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा यांनी पाणीपुरवठा खात्याचा कारभार हातात घेतल्यावर महाराष्ट्रात, एकूण 1.42 कोटी ग्रामीण घरांपैकी 95.30 लाख घरांमध्ये (66.94%) नळाने पाणीपुरवठा करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
15 ऑगस्ट 2019 साली, जल जीवन अभियानाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात 48.43 लाख (34.02%) घरांमध्ये नळाने पाणीपुरवठ्याची सोय होती.
ना.गुलाबरावजी पाटील यांनी पाणीपुरवठा खात्याचा कारभार स्वीकारल्यावर 26 महिन्यांत, राज्यातील 46.85 लाख घरांमध्ये नळाने पाणीपुरवठयाची सोय करण्यात आली.
येत्या वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील 27.45 लाख घरांमध्ये नळाने पाणीपुरवठा करण्याचे मंत्रीमहोदयांचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्रातील मिळालेले हे यश पाहून
केंद्र सरकारने जल जीवन अभियानाअंतर्गत 2021-22 या वर्षासाठी महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत वाढ करुन तो निधी 7,064.41 कोटी इतका वाढवला आहे.
2020-21 मध्ये हा निधी फक्त 1,828.92 कोटी रुपये इतका होता.
परंतु जर पाणीपुरवठा योजनेला पाण्याचा स्रोत च उपलब्ध नसेल तर फायदा काय होईल या उद्देशाने धार गावाला केटीवेअर बंधारा मंत्रीमहोदयांनी मंजूर केला आहे.
गणपती मंदिराजवळ पेव्हर ब्लॉकची ग्रामस्थांची मागणी होती. त्याचे भूमिपूजन करताना मला विशेष आनंद वाटत आहे.
याआधीही धार गावात स्मशानभूमी सुशोभीकरण, धार ते अंजनविहिरे रस्त्याचे 2 किलोमीटर डांबरीकरण, सुमारे 4 किलोमीटरचे शेत पाणंद रस्ते, पाण्याची बसकी टाकी अशी विकासकामे गावात मंत्रीमहोदयांच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहेत असे प्रतिपादन त्यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील, जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर, माजी सभापती सचिन पवार, सरपंच उत्तम सोनवणे, युवा सेना प्रमुख सौरभ पाचपोळ, दीपक सावळे, उदयभान सोनवणे, ग्राम पंचायत सदस्य नारायण आनंदा पाटील, शांताराम काळू पाचपोळ, सुभाष संतोष पाटील, मुरलीधर ओंकार पाटील व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.