*आदिवासी कोळी समाजाचा आंदोलनात शहिद भटू कुंवर यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधी देण्यात सापत्न वागणूक का?अ.भा.कोळी/कोरी समाज संघटनेचा सवाल*
धुळे दि.३०(प्रतिनिधी):*मराठा समाज आंदोलनात मृतीमुखी पडलेल्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला. मात्र आदिवासी कोळी समाज आंदोलनात शहिद झालेल्यांना एक कवडीही न देणाऱ्या राज्य शासनाचा धिक्कार असून अशी सापत्न वागणूक आदिवासी कोळी समाजाविषयी का? असा जाहीर संतप्त सवाल अ.भा.कोळी/कोरी समाज संघटनेने केला आहे.
मराठा समाज आंदोलनात मृतीमुखी पडलेल्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला.असे एकूण 34 कुटूंबियांना 2 कोटी 65 लाख रुपयांचा निधी मराठा कुटुंबियांना मदतीची रक्कम दिली.तसेच मागील सरकारच्या काळात यापैकी 15 कुटूंबाना 5 लाख रुपये निधी देण्यात आलेला आहे.*
परंतु आदिवासी कोळी जमातीला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानिक अधिकार मागण्यासाठी धुळे येथे आंदोलन करण्यात आले त्यात पोलिसांनी बेछूट गोळीबार करून आमच्या जमतीवर अत्याचार केला आणि त्यात आमचे वडाळी ता.शहादा जिल्हा नंदुरबार येथील भटूभाऊ कुवर हे पोलिसांनि केलेल्या गोळीबारात शहीद झाले.परंतु वेळोवेळी कोळी जमातीचे संघटनेने शहिद भटूभाऊ कुवर यांच्या वारसासही मुख्यमंत्री निधीतून सहायता मिळावी तसेच त्यांच्या वारसास नोकरी मिळावी म्हणून मागणी करण्यात आली परंतु अद्यापपर्यंत शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही.असा दुजाभाव सरकारने केलेला आहे.
पुन्हा आम्ही शासनास विनंती करीत आहे की कै.भटूभाऊ कोळी यांच्या वारसास मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी अशी मागणी अखिल भारतीय कोळी कोरी समाज महाराष्ट्र राज्य संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खेमचंद्रजी कोळी यांचे मार्गदर्शनाखाली, प्रदेश अध्यक्ष शिवामहाराज भांडे, प्रभारी प्रदेश अध्यक्ष श्री.संजीव शिरसाठ,प्रदेश सरचिटणीस डॉ राजेंद्र सावळे,प्रदेश युवा अध्यक्ष श्री.अश्विनभाऊ सोनवणे,महिला प्रदेश अध्यक्षा मीराताई कोलकोटे ,प्रदेश उपाध्यक्ष श्री.नरेश कोळी,कोकण विभाग सरचीटणीस सदानंद कोळी प्रदेश कार्याध्यक्ष देविदास बापू कोळी,प्रदेश युवा सरचिटणीस श्री.राहुल कोळी, कोकण महिला अध्यक्षा सौ.शर्मिला नरेश कोळी आदींनी केली आहे.
*