*" भारतीय चित्रकला का संक्षिप्त* *इतिहास और प्रमुख* **चित्रकार"*या पुस्तकात* *खान्देश* *कलारत्नांच्या गौरव*...
मनवेल ता.यावल :दि.३०(प्रतिनिधी): खान्देशातील निसर्ग चित्रकार श्री भागवत सपकाळे, श्री. मनोहर बावीस्कर, श्री. रियाझ काझी यांच्या जीवन प्रवासांची नोंद राजस्थानातील प्रख्यात चित्रकार आणि साहित्यकार रमेश शून्य रचित व लेखिका बबीता कुमारी यांच्या लिखाणातून पुस्तकाची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांना कलेचा इतिहास परिचित करण्यासाठी व प्रतिभावंत चित्रकारांची चित्र शैली च्या तंतोतंत अभ्यास या पुस्तकात करण्यात आला आहे. यात आपल्या खान्देशातील प्रतिभावंत चित्रकार श्री भागवत सपकाळे, मनोहर बावीस्कर, रियाझ काझी यांच्या जीवन प्रवासांची नोंद झाली आहे. राजस्थान राज्यातील टी. जी. टी. व पी. जी. टी. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे फायदेशीर ठरणारे पुस्तक आहे. जळगाव तालुक्यातील फुपणी येथील मुळ रहिवासी निसर्ग चित्रकार श्री भागवत सपकाळे ते मुंबई येथे एअरपोर्ट हाय स्कूल विलेपार्ले येथे कलाशिक्षक पदावर कार्यरत आहेत आपल्या कलेचा बळावर कलाक्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल करून जलरंगातील निसर्ग चित्रात स्वतंत्र कला शैली निर्माण केली आहे तसेच पाच तासांत दोनशे निसर्ग चित्र रंगविण्याचा भारत वर्ल्ड रेकॉर्ड करू खान्देश चे नाव जगभर प्रसिद्ध केले आहे. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, महात्मा गांधी दर्शन पुरस्कार, उपक्रम शिल कलाध्यापक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात केले आहे. श्री मनोहर बावीस्कर चाळीसगाव तालुक्यातील पिलखोळ या गावाचे मुळ रहिवासी आहेत ते प्रगती विद्यालय बोरिवली येथे कलाशिक्षक पदावर कार्यरत आहेत पेन्सिल शेडिंग पोर्ट्रेट या विषयावर नाविन्यपूर्ण बदल करून आपली कला शैली विकसित केली आहे. कोरोना काळात समाजाचे विघ्न दुर व्हावे यासाठी दहा तासात बाराशे पन्नास श्री गणेशा ची विविध रुपे साकारली आहेत त्यांची दखल गीनीज बुक ऑफ रेकॉर्ड. व इडिंया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली आहे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र दर्पण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार 2020 साठी गौरविण्यात आले आहे. रियाझ काझी चाळीसगाव तालुक्यातील सायगाव या गावाचे सुपुत्र मुंबई येथे आयडियल हायस्कूल व ज्यु कॉलेज मधे कलाशिक्षक पदावर कार्यरत आहेत पोस्टर कलर मधील त्यांची निसर्ग चित्रे अप्रतिम आहेत त्यांना कलारत्न पुरस्कार, कला भुषण पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे