चिमठाणे येथे शेतकऱ्यांना मोफत डिजिटल 7/12 चे वाटप....

 


चिमठाणे येथे शेतकऱ्यांना मोफत डिजिटल 7/12 चे वाटप....


चिमठाणे प्रतिनिधी -प्रविण भोई....

चिमठाणे येथे देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवी वर्षानिमित्त मोफत संगणिकृत  डिजिटल स्वाक्षरीकृत अधिकार अभिलेख गा.नं .7/12 उताऱ्याची प्रत उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय पारित झाला होता त्या अनुषंगाने...  महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ नुसार मान्यता देण्यात आली होती... शासन आदेशानुसार अधिकार अभिलेख विषयक  अद्यावत डिजिटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या  7/12 उताऱ्याची  प्रत गावातील तलाठी मार्फत प्रत्येक खातेदारास   घरो घरी जाऊन  सातबारा वाटपाचे उद्दिष्ट शासन स्थरावरून  देण्यात आले होते...  या मोहिमे अंतर्गत  व आदेशानुसार डिजिटल साक्षांकित  सातबारा या उद्दिष्टाच्या पार्श्वभूमीवर 2 ऑक्टोम्बर महात्मा गांधी जयंती राज्य शासनाच्या शासन निर्णयाने  शेतकऱ्यांना मोफत 7/12 उतारा वाटपाला सुरुवात करण्यात आली होती..त्याचाच भाग म्हणून आज दि.1/12/ 21रोजी ग्राम पंचायत चिमठाणे येथे शेतकऱ्यांना मोफत 7/12 चे वाटप करण्यात आले आहे...त्या वेळी चिमठाणे (ग्रा.पंचायत सरपंच   )खंडू वंजी भिल,(ग्रा.उपसरपंच )सुरतसिंग बखतसिंग गिरासे,(माजी .उपसरपंच )दिलीप दामू धनगर ,(रोजगार सेवक )प्रकाश जैन, चिमठाणे सजाचे तलाठी जे.व्ही .निकम व गावातील शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत डिजिटल 7/12 चे वाटप करण्यात आले......

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने