*27 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची राज्यभर आंदोलने !.. राज्य अधिवेशनात निर्णय..!*जळगाव जिल्हा परिषदेवर ही प्रचंड मोर्चा*
*चोपडा*दि.२२(प्रतिनिधी) .. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गोंदिया येथे नुकतेच राज्यव्यापी १२ वे अधिवेशन घेण्यात आले या अधिवेशनाला आयटक चे राष्ट्रीय महासचिव कॉम्रेड अमरजीत कौर( दिल्ली) उद्घाटक होत्या शहरात प्रचंड रॅली नंतर यांनी उद्घाटनपर भाषण सांगितले की ,गेल्या सात वर्षांपासून मोदी सरकारच्या खाजगीकरण निती मुळे व सार्वजनिक मालमत्ता उद्योग विक्री निती मुळे व त्या आधीच्या नोटबंधी मुळे प्रचंड आर्थिक संकट देशावर आले आहे.. कामगारांचा रोजगार हिरावला जात आहे. ग्रामपंचायत कर्मचारी व दुसरे असंघटित कर्मचारी अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. त्या संघर्षात आयटक त्यांना साथ देत राहील असा विश्वास दे त्यांनी सरकारच्या कामगार जन विरोधी निती बरोबर श्रमिक जनतेत जात धर्म नावाने फूट पाडून देशात सांप्रदायिक जहर पसरवण्याचे कारस्थान हाणून पाडा. असे आवाहन केले नंतर दोन दिवस प्रतिनिधी झाले . कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर परिस्थितीवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.विविध ठराव करण्यात आले.*त्यात शेतकऱ्यांच्या यशस्वी आंदोलनामध्ये कामगार वर्गाने दिलेली साथ याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला* आहे .अधिवेशनाचे अध्यक्ष काम रेड शाम चींचने सातारा उज्जवल गांगुर्डे नासिक अधिवेशनाचे आयोजक व नूतन नवनिर्वाचित राज्य कार्याध्यक्ष मिलिंद गणवीर होते. अधिवेशनाचे कामकाज राज्य अध्यक्ष प्रा तानाजी ठोंबरे राज्य महासचिव नामदेवराव चव्हाण खजिनदार तुकाराम भस्मे यांच्या व राज्य कार्यकारिणी चे मार्गदर्शनात झाले. २२जील्यांचे २०० प्रतिनिधी त्यात जळगाव जिल्ह्यातून चोपडा धरणगाव एरंडोल चाळीसगाव तालुक्यांतून १२ प्रतिनिधी.. राज्य सचिव कामरेड अमृत महाजन ह्यांचे नेतृत्वात सहभागी झाले होते. या अधिवेशनाचे येत्या २७ डिसेंबर रोजी राज्यभर महासंघाचे वतीने जिल्हा परिषदांवर निदर्शने धरणे मोर्चे आंदोलन करण्या चाआदेश दिला या आंदोलनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर न झाल्यास येत्या १ जानेवारीपासून जिल्हावार कर्मचारी कोल्हापूर येथे त्या जील्याला नमूद तारखेस ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचे ठरले.त्यात जळगाव जिल्ह्यातील कर्मचारी १० जानेवारी २०२२ रोजी आंदोलन करतील असे जळगाव जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
*आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अशा.. माननीय अभय यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वर्ग-3 व वर्ग-4 कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करा माननीय दीपक म्हैसेकर समितीच्या शिफारशी प्रमाणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन द्या कामगार विभागाच्या 10 ऑगस्ट 2020 च्या परिपत्रक प्रमाणे कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन साठी तरतूद करा किमान वेतनासाठी गट व 28 एप्रिल 2020 रोजी नदीच्या परिपत्रकानुसार उत्पन्नाची वसुली ची अट रद्द करून कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ता साठी १००टक्के अनुदान द्या कोरोनामध्ये मयत कर्मचाऱ्यांचे वारसांना विमा कवच रक्कमा द्या, जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वाट्याच्या 10 आरक्षण जागा भरा. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करा. आदी मागण्यांचा समावेश आहे* जळगाव जिल्हा परिषदेवरसुध्धा 27 डिसेंबर रोजी सकाळी बारा वाजता जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मोर्चा लालबावटा ऑफिस जळगाव येथून आयोजित करण्यात आलेला आहे.जळगाव जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी हा मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे नवनिर्वाचित सचिव कॉ अमृत महाजन जिल्हाध्यक्ष कॉ संतोष खरे ,कॉम्रेड गोरख वानखेडे नवनिर्वाचित राज्य समिती सदस्य अशोक जाधव एरंडोल रवींद्र पाटील धरणगाव तसेच उख धीवर बोदवड, विश्वास पाटील ,बुलबुल पाटील एरंडोल अनंता कारंडे प्रमोद शेळके गणेश सुरवाडे विथळ कोळी संदीप देवरे मलखान राठोड प्रकाश पाटील मच्छिंद्र पाटील आदींनी केले आहे